नणंद भावयज लढतीत पेडण्यात कुणी मारली बाजी? नात्यांमधील राजकीय चढाओढीत कोण वरचढ?

भाजपचा पेडण्यात दणदणीत विजय

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : पेडणे पालिकेचा निकाल लागला. या पालिकेत भाजपनं दणदणीत विजय मिळवला. पण पालिका निवडणुकीआधीपासून चुरशीची लढत पाहायला मिळेल अशी चर्चा रंगली ती सख्खी नाती राजकीय रिंगणात उतरल्यामुळे. या नात्यांमध्ये कुणी कुणावर मात केली, याकडे संपूर्ण पेडणे तालुक्याचं लक्ष लागलं होतं. मामा भाची, नणंद भावजय, अशा लढतींनी पेडण्याची निवडणूक आणखीनच रंगतदार केली होती.

कुणाची बाजी?

पेडणे पालिकेवर पूर्ण बहुमत भाजपाने मिळवलं. १० पैकी सहा उमेदवार विजयी झाले. निवडून आलेल्या दहाही नगरसेवकाकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. जे पराभूत झाले त्यांची कारणे पराभूत उमेदवारानांही माहीत आहे. मात्र या निवडणुकीतून प्रस्तापितांना धडा मिळालाय. दिग्गजांचा पराभव आणि बसलेले धक्के त्यातून पराभूत उमेदवारांना धडा घ्यावा लागेल. तसंच भाजपनेच भाजपचा पराभव केल्याचीही चर्चा पेडण्यात रंगली आहे. मामा भाची सून विजयी तर भाची पराभूत, भावजयेकडून नणंद पराभूत, भावजय दीर पराभूत असा प्रकार या निवडणुकीत पहायला मिळाला.

हेही वाचा – पालिका अनेक, पण निकालाची लिंक एक! वाचा सगळे निकाल इथे

कुणी धडा शिकवला?

प्रकाश कांबळी व श्वेता कांबळी हे दीर भावजय या निवडणुकीत पराभूत झाले. तर विष्णू साळगावकर आणि नेहा आसोलकर मामा भाची पैकी मामा विजयी ठरलाय. शिवाय भाची सून राखी कशाळकर विजयी ठरल्याय. मात्र भाची नेहा आसोलकर पराभूत झाल्या. विशाखा गडेकर आणि शीतल कलंगुटकर या भावजय नणंद. राजकीय लढाईत उतरलेल्या या नात्यांमध्ये विशाखा गडेकर यांनी आपल्या नणंदेचा पराभव केलाय.

हेही वाचा – साखळीत मुख्यमंत्र्यांना हारवणारा निकाल आला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!