दोघे बल्गेरियन भामटे ताब्यात; पेडणे पोलिसांकडून कारवाई

एटीएम स्किमिंगप्रकरणी कारवाई. चौकशीसाठी पर्वरी पोलिसांच्या ताब्यात.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : एटीएम स्किमिंगप्रकरणी पर्वरी पोलिसांना हवे असलेल्या दोघा बल्गेरियन भामट्यांना पेडणे पोलिसांनी पकडले.

पेडणेचे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी (Jivba Dalvi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वरी पोलिसांकडून या संदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यानुसार पेडणे पोलिसांनी पाळत ठेवली होती. मोरजी येथे दोन इसम संशयास्पदपणे फिरत असल्याची माहिती मिळताच निरीक्षक जिवबा दळवी यांच्यासह पीएसआय प्रफुल गिरी, पीएसआय हरीश वायंगणकर, कॉन्स्टेबल विनोद पेडणेकर, रवी माळोजी, अनिशकुमार पोके यांनी मोरजीत जाउन त्या दोघांना पकडले आणि पेडणे पोलीस स्थानकावर आणले.

नंतर पर्वरी पोलीस स्थानकाचे पीएसआय सीताराम मळीक व सहकार्‍यांनी त्या बल्गेरियन भामट्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!