पेडण्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

गर्दी करु नका सांगूनही बाजारात वर्दळ; खरेदीसाठी लोकांची गर्दी

मकबूल माळगीमनी | प्रतिनिधी

पेडणेः राज्यात नवे निर्बंध लागू झाल्यानंतरच पहिलाच दिवस आहे. आणि पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचं पेडण्यात पाहायला मिळालंय. आठवडी बाजारांवर सरकारनं बंदी घातलेली नाही. त्यामुळे आता हे आठवडी बाजार कोरोना संसर्ग वाढवण्यात मदत करतील की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नेहमीप्रमाणे जशी वर्दळ एखाद्या आठवडी बाजारात दिसते, तशी वर्दळ पेडण्यात दिसते आहे. कोरोनासारखी महामारी राज्यात भयंकर रुप धारण करतेय. पण त्याचं जराही भय लोकांना आहे का, असा प्रश्न या दृश्यांवर कुणालाही पडेल.

10 गोष्टी राहूनच गेल्या

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत हा जोडून सगळ्यांना विनंती केलीये.. की ५ पेक्षा जास्त लोकांनी कृपा करुन एकत्र जमू नये. पण पेडण्यातील लोकांनी बहुतेक या महामारीची जाणीव झाली नसावी. आठवडी बाजार भरला. गर्दी झाली. यामुळे जे निर्बंध नेमके सरकारनं लावले होते, त्याच निर्बंधावेळी काही गोष्टी मुख्यमंत्र्यांकडून सांगायच्या राहून गेल्याचं गोवनवार्ता लाईव्हनं नमूद केलं होतं.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतून निसटलेले 10 मुद्दे

मुख्यमंत्र्यांनी मार्केट, आठवडा बाजार सुरू राहणार म्हणून सांगितलं होतं. पण इथे गर्दी कशी रोखणार याविषयी त्यांनी काहीच स्पष्ट केलं नाही. ऑक्सिजनची मागणी किती, याबाबत ठोस माहिती देणं त्यांनी या पत्रकार परिषदेत जवळजवळ टाळलंच. तसंच रेमडेसिविरच्या किमतीबाबत कोणतंही वक्तव्य केलं नाही. पाचपेक्षा जास्त जणांनी जमू नये असं म्हटलं खरं मुख्यमंत्र्यांनी. पण मार्केटमध्ये हे शक्य कसं होणार ते नाही सांगितलं. पाचजण एकत्र दिसले, तर काय करणार हे ही नाही सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यात टुरिस्ट टॅक्सीवाल्यांच्या आंदोलन बहुधा मुख्यमंत्री विसरले. कारण त्यांचाही कुठेच उल्लेख झाला नाही. खासगी बसेस सुरू राहणार म्हटलं, पण 50 टक्के क्षमतेवर कोण लक्ष ठेवणार त्याचा उल्लेख नाही. अ‍ॅम्बुलन्स कशा उपलब्ध करणार, याचीही माहिती दिली नाही. शिवाय कंटेन्मेंट झोन जाहीर करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पण मग तिथल्या लोकांचं काय याबद्दलही माहिती नाही. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जे निर्बंध लावलेत, त्याच्या अंमलबजावणीची कार्यवाही कशी करणार? हा प्रश्नही अनुत्तरीतच ठेवला मुख्यमंत्र्यांनी..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!