अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलं म्हशीला जीवदान

एका शेतात रात्रभर म्हस रुतल्यानं अडकली होती

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : अग्निशमन दलाच्या जवानांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. शेतात रुतून पडल्यानं अडकलेल्या म्हशीला अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिलंय. रात्रभर ही म्हस शेतातल्या अडकून पडली होती. याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घडनास्थळी धाव घेतली आणि म्हशीला जीवदान दिलं.

मनोज हरमलकरांनी म्हैस शेतात अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला दिली. रात्रभर ही म्हैस शेतात अडकून पडली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिलं. स्थानिक माजी नगरसेवक, भावला मांद्रेकार, मनोज हरमलकर, माजी नगराध्यक्ष इजिदोरे फेरनंदिस, स्थानिक मेघश्याम हरमलकर आणि इतर लोकांनी अग्निशामक दलाला यावेळी मोलाचं सहकार्य केलं. मोहन हरमलकर यांच्या मालकीची ही म्हैस होती. या कामगिरीबाबत अग्निशमन दलाचं पेडण्यातील नागरिकांनी आभार मानलेत.

पेडणे : अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलं म्हशीला जीवदान

Posted by Goanvartalive on Monday, 21 December 2020
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!