आपची ताकद वाढली! बाणावली येथील नागरिकांचा आम आदमी पक्षात प्रवेश

राज्यातील 'आम आदमी'चा आम आदमी पक्षाला वाढता पाठिंबा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : बाणावली येथील नागरिकांनी आम आदमी पक्षामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. यावेळी आम आदमी पक्षाचे निमंत्रक आणि नेते राहुल म्हांबरेंसोबत पक्षाचे इतर सदस्य आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.

बाणावलीत आज (20 ऑक्टोबर) संध्याकाळी 4.30 वाजता झालेल्या कार्यक्रमात बाणावलीसह वार्का, कावेलोसी, कोलवा आणि कारमोणा भागातील नागरिकांनी आपमध्ये रीतसर प्रवेश केलाय. वेन्झी व्हिएगश या बाणावली येथील सामाजिक कार्यकर्त्याने यासाठी पुढाकार घेताना या भागातील रहिवाशांना आम आदमी पक्षात प्रवेश करून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. आप नेते राहुल म्हांबरे यांनी सकारात्मकतेने नव्या सदस्यांचे स्वागत करताना आपले विचार व्यक्त करताना म्हटले की येत्या काळात आणखीन बरेच लोक आम आदमी पक्षात येतील.

यावेळी सर्वांना संबोधित करताना आप नेते राहुल म्हांबरे म्हणाले की…

बाणावली, वार्का, कोलवा आणि आसपासच्या भागातील नागरिक लॉकडाउन आणि कोरोना महामारीच्या काळात पक्षाने केलेल्या कार्यामुळे भारावून गेलेले असून त्यांच्या हृदयात पक्षाबद्दल आस्था निर्माण झालेली आहे.

ते पुढे म्हणाले की ते स्वतः आणि आम आदमी पक्षाचे इतर कार्यकर्ते नव्या सदस्यांचे सहृदयतेने मोठ्या मनाने त्यांचे स्वागत करीत आहेत आणि आता त्या सर्वांनी गोव्याला भ्रष्टाचार आणि प्रशासकीय शक्तीचा दुरुपयोग होण्यापासून सध्याच्या सरकारला रोखले पाहिजे.

यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या बाणावली आणि इतर भागातील नागरिकांनीही आपले मनोगत आणि विचार व्यक्त केले. आम आदमी पक्षाने सध्याच्या कोरोना संकटावेळी राज्यात जी कामगिरी केली, ती बघून त्यांनी आम आदमी पक्षात एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन प्रवेश केल्याचं नागरिकांनी म्हटलंय. एकत्र येत उत्साहाने एका चांगल्या गोव्याच्या निर्माणासाठी कार्यरत राहण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेतेही यावेळी आवर्जून उपस्थित होते. त्यांनीही आपले विचार आणि मनोगते यावेळी व्यक्त केली. राज्यात आपला मिळत असणारा वाढता पाठींबा लक्षणीय मानला जातोय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!