CORONA UPDATE | पर्वरीत कोरोनाचा हाहाकार

पेन्हा दे फ्रांका आणि साल्वादोर द मुंद ग्रामपंचायतीत 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः पर्वरीत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नवी कोरोना प्रकरणे आढळून आल्यानं संपूर्ण शहरालाच जणू कोरोना संसर्गाने वेढा घातलेला आहे. या अनुषंगाने पर्वरीतील काही गावांनी 15 मे पर्यंत पूर्ण लॉकडाऊन जाहीर केलाय.

कुठल्या ग्रामपंचायतींनी जाहीर केला लॉकडाऊन?

पर्वरीतील पेन्हा दे फ्रांका आणि साल्वादोर द मुंद ग्रामपंचायतींनी 15 मे पर्यंत पूर्ण लॉकडाऊन करत असल्याचं जाहीर केलंय. दोन्ही गावांमध्ये कोरोनाचे अधिकाधिक रुग्ण आढळून येत असल्याचं हा निर्णय घेण्यात आलाय. दोन्ही पंचायतींनी मिळून चर्चा करून हा निर्णय घेतलाय. हा लॉकडाऊन म्हणजे कोरोनाची साखळी तोडण्याचा एक प्रयत्न असल्याचं ग्रामपंचायतींकडून सांगण्यात आलंय.

काय राहणार सुरू?

 • किराणा सामान, भाज्या, फळे, दूध, ब्रेड, हार्डवेअर, सुपर मार्केट्स, मासे, पेट फूड दुकानं इ. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 6 ते 11 यावेळेत खुली असणार आहेत.
 • उपजिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केवळ धार्मिक विवाह समारंभ करता येणार आहेत.
 • चालू असलेल्या घराच्या दुरुस्तीचं काम जास्तीत जास्त ४ कामगारांसह करण्याची परवानगी असेल.
 • बॅंक, पोस्ट या ठिकाणी सकाळी 11 पर्यंतच लोकांना प्रवेश. त्यानंतर बॅंक कर्मचाऱ्यांचं काम चालू राहणार आहे.

यांनाच काम करण्याची परवानगी

 • अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांच्या वाहतूकीस परवानगी देण्यात आलीये.
 • गॅस एजन्सीज, हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक सेंटर्स, क्लिनिक्स, लसीकरण केंद्रे, फार्मसी, पशुवैद्यकीय सेवा, अॅनिमल केअर शेल्टर आणि आरोग्य सेवा यासारख्या अत्यावश्यक सेवा, या सर्वांवर प्रतिबंधित वेळेची मर्यादा असणार आहे.
 • स्विगी, झोमॅटो आणि इतर होम डिलिव्हरी सेवांमध्ये दाखल झालेली रेस्टॉरंट किचन्सना परवानगी देण्यात आलीये.
 • कुरिअर सेवा जसे की अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि अशा इतर सेवांना परवानगी देण्यात आलीये.
 • सेक्युरिटी एजन्सीज आणि कंपन्यांना वेळेच्या पलीकडे काम करण्याची मुभा आहे.
 • सरकार, सेमी गव्हर्नमेंट आणि खासगी इंडस्ट्रीज/फर्म्समध्ये काम करणाऱ्या रहिवाशांना वैध रोजगार कागदपत्रे किंवा ओळखपत्र प्रदान केल्यावरच जाण्या-येण्याची परवानगी मिळणार आहे.
 • ज्या हॉटेलमध्ये अगोदरपासून अतिथी आणि मूलभूत देखभाल कर्मचारी आहेत त्यांनाच परवानगी आहे. कोणतीही नवीन बुकिंग स्वीकारली जाऊ शकत नाहीत.
 • सरकार तसंच पंचायतीकडून मान्सूनपूर्व आणि तातडीच्या विकास कामांना परवानगी देण्यात आलीये.

यांना परवानगी नाही

 • सलून, स्पा, मसाज पार्लर, जीम, टॅटू सेंटर, गारमेंट स्टोअर, ड्राय फ्रूट विक्रेते, ब्युटी पार्लर इ.
 • सेलिब्रेशन आणि पार्टी हॉल
 • सार्वजनिक बसेस
 • बार्स, रेस्टॉरंट्स आणि फिशिंग जेट्टी
 • स्विमिंग पूल्स, मैदान आणि स्पोर्ट्स ग्राऊंड
 • चित्रपट, सिरिज आणि जाहिरातींचे शूटिंग
 • गार्डन्स, पार्क, मैदान, मोकळ्या जागा
 • खासगी कोचिंग क्लासेस किंवा 4 पेक्षा जास्त लोक असलेले क्लासेस
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!