पेडणे बाजारात समानाची दुप्पट भावाने विक्री

कोरोनाचं सावट असलेली दुसरी गणेश चतुर्थी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे: चतुर्थीच्या काळात पेडणे पालिका क्षेत्रात मुख्य रस्त्यावर आणि गावागावांतील रस्त्यांवर किंवा खास स्टॉल उभारून गणेश चतुर्थीसाठी लागणारं माटोळीचं सामान उपलब्ध झालं आहे. परंतु गतवर्षापेक्षा या सामानाचा दर दुप्पट झाला आहे.

कुठले सामान किती रुपये?

उतरलेला नारळ पूर्वी ५० रुपयांना मिळत होता, तो यंदा १०० रुपये, काकडी मोठी ५० रुपये होती, ती यंदा १०० रुपये, बेडे २०० रुपयाला गेल्यावर्षी मिळत होते ते यंदा ४०० रुपये झाले, ‘कान्कले’, ‘हरण’, पत्री इतर सर्व वस्तू अव्वाच्या सव्वा दराने विकले जात होते.

कोरोनाचं सावट असलेली दुसरी गणेश चतुर्थी

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा दुसऱ्यांदा ही गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. यंदा डोंगर माळरानात मिळणारे माटोळीचे सामान कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने या सामानाचे भाव वाढलेले आहेत. शिवाय माळरानावर पूर्वी मोठ्या प्रमाणात हरण, फुले मिळत होती, यंदा ती अतिशय कमी प्रमाणात मिळाली, असे विक्रेत्यांनी सांगितले.

हा व्हिडिओ पहाः POLITICS| LOBO- पुन्हा एकदा मायकल लोबो राजकीय कृतीमुळे चर्चेत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!