पेडणे पोलिसांकडून पर्यटकांना लुटलेल्या ४ आंतरराज्य चोरट्यांना अटक

पेडणे पोलिस निरिक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणेः पर्यटकाला लुटलेल्या चार संशयित चोरट्यांना पेडणे पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या संशयित चोरट्यांच्या टोळीत दीपेंद्र सिंग, प्रल्हाद सोनी, अंजलिका मुकेश जयस्वाल आणि बिकी बारीक यांना समावेश आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घसरण

कारमध्ये लिफ्ट दिली अन् मारहाण करून लुटलं

पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार १८ रोजी अजितकुमार चेन्नाई या २२ वर्षीय युवकाने पेडणे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत आपल्याला चौघा अज्ञातांनी लुटल्याचं म्हटलं होतं. दाभोळी विमानतळावर दोन अज्ञात पुरुष आणि दोन महिला यांच्या संपर्कात आल्या. त्यांनी त्या युवकाला कारमध्ये लिफ्ट दिली आणि प्रथम त्याला ते फोंड्याला घेऊन गेले, त्यानंतर पेडणे येथे युवकाला मारहाण करून त्याच्याकडील रोख २००० रुपये आणि त्याची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅगही हिसकावून घेतली. त्या संशयितांनी त्याला जिवंत मारण्याची धमकी देत त्याच्या एटीएम कार्डवरून 22,000 रुपये काढून घेतले आणि पसार झाले होते.

हेही वाचाः रिंगणच्या संत नरहरी सोनार विशेषांकाचं दिमाखात प्रकाशन

पेडणे पोलिसांकडून कारवाई; संशयितांना घेतलं ताब्यात

या तक्रारीची दखल घेऊन पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली पथकं तयार करून चौकशीला सुरुवात केली. पोलिसांना संशयितांनी वापरलेली कार कळंगुट येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांचं पथक कळंगुट येथे दाखल झालं आणि त्यांनी जीए-11-ए-5222 या क्रमांकाच्या कारसह चौघा संशयितांना ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान दीपेंद्र सिंगने ज्योती प्रल्हाद सोनी, अंजलिका मुकेश जयस्वाल आणि एक बिकी बारीक अशी या प्रकरणात सहभागी असलेल्या इतरांची नावं उघड केली. त्यानंतर सर्व संशयितांवर पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केली.

हेही वाचाः मोठा खुलासा! प्रेयसीच्या भावानं घडवून आणली अमरची हत्या, कारण….

पेडणे पोलिस पथकाची कारवाई

या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई, पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जिवबा दळवी पुढील तपास करत आहेत. या कारवाईत दळवी यांच्यासह उपनिरीक्षक  हरीश वायंगणकर, उपनिरीक्षक  विवेक हळर्णकर, उपनिरीक्षक  संजीत कांदोळकर, हेडकॉस्टेबल  गुरुदास मांद्रेकर, सागर खोर्जुवेकर, यशोदास उगवेकर, विनोद पेडणेकर, अर्जुन कळंगुटकर, राजन धरण, देवदास यांच्यासह तपास पथक  दीपा शेट्ये,  तृप्ती सातोडकर आदींचा सहभाग होता.

हेही वाचाः शिक्षणातून प्रगती करा! विद्यार्थ्यांना मोफत wifi देताना जीत आरोलकरांचं वक्तव्य

संशयितांकडून चोरी केलेली त्या युवकाची कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आणि गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | POT HOLES | MERCES JUNCTION | मेरशी जंक्शनवरील रस्त्यावरील खड्डे धोकादायक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!