ट्रॅफिक झालं अन् डाव फसला

Goan Varta Live | प्रतिनिधी
म्हापसा: पेडे येथे राष्ट्रीय महामार्गावर लुबाडणुकीच्या इराद्याने मालवाहू ट्रकला अडविण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघांना अटक केली, तर कार जप्त केली आहे. अटक केलेल्यांमध्ये निगेल मोन्तेरो (३०, पिलार तिसवाडी), आलेवस डिसोझा (३०, दांडो गोवा वेल्हा) व सद्दाम अब्दूल शेख (२८, सिनारीभाट, पिलार) यांचा समावेश आहे.

गुरुवारी मध्यरात्रीची घटना
सदर घटना गुरुवारी मध्यरात्री 1च्या सुमारास घडली. ट्रक फिर्यादी चंद्रा ईश्वर (जुवारी नगर – वास्को) हे कोलवाळ येथील बिनानी कंपनीला माल पुरविण्याचं काम करतात. रोजच्याप्रमाणे त्यांनी रात्री १० वा. वास्को येथे आपल्या जीए 01 यू 3380 क्रमांकाच्या ट्रकमध्ये माल भरला व ते रात्री कोलवाळकडे निघाले. त्यांच्या मागे अजून एक ट्रक होत.
हेही वाचाः CRIME | ताळगावात तरुणावर चाकूने हल्ला
ट्रॅफिक झाल्याने सगळा डाव फसला
पेडे येथे वृंदावन इस्पितळाजवळ ट्रक पोचताच संशयितांनी आपली जीए 03 आर 2932 क्रमांकाची आयटेन कार आडवी घालून ट्रक अडवला. तिघाही संशयितांनी फिर्यादी ट्रक चालकाला गाडीतून ओढून बाहेर काढलं. लुबाडणूक होईल या भीतीने फिर्यादीने संशयितांकडून सुटका करून घेतली व पळ ठोकली. यावेळी समोरून व मागून गाड्या आल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे संशयितांना आडवी घातलेली गाडी काढता आली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे दाखल झाले व त्यांनी संशयितांना पकडून ताब्यात घेतलं.
हेही वाचाः Crime | राज्यात महिला असुरक्षित? साखळी पाळी काटा इथं महिलेला लुटून मारहाण
संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
पलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 341, 504, 426, 506 (21) कलमाखाली गुन्हा नोंद केला व संशयितांना अटक केली. संशयितांना येथील न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.