‘नाकाखाली मास्क घालायचा असेल तर त्यापेक्षा घालूच नका ना!’, आरोग्यमंत्री कडाडले

आरोग्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाची वक्तव्यं

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील कोरोना लसीच्या ड्रायरनबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांनी कोरोनाच्या एसओपीबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे जानेवारीत रुग्णसंख्या वाढण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवलाय. दुसरीकडे मास्क न घालणाऱ्यांवरही त्यांनी संपात व्यक्त केला. फॅशन म्हणून नाकाखाली मास्क लावणाऱ्यांना त्यांनी सुनावलंय. नाकाखाली मास्क घालायचा असेल तर त्यापेक्षा घालूच नका ना, असं म्हणत त्यांनी खडे बोल सुनावलेत. त्याचप्रमाणे मास्क न घालणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकाराला पाहिजे. पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्र्यांनी केलेली महत्त्वाची वक्तव्य खालीलप्रमाणे –

महत्त्वाची वक्तव्य –

सरकारने मास्क न घालणाऱ्यांवर ५०० रूपये दंड आकारला पाहिजे, सरकारला सल्ला

सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन झालंच पाहिजे

मोफत उपचार देणारं गोवा एकमेव राज्य

मास्क फॅशन म्हणून नाकाखाली ठेवणं धोकादायक

गोवा बनाना रिपब्लीक नाही, पर्यटकांनी मार्गदर्शक तत्त्वं टाळणं गरजेचं

हेही वाचा – लसीकरणाच्या ड्रायरनला सुरुवात, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मास्क न घातल्यास कडक कारवाई करु, आरोग्यमंत्र्यांचा इशारा

जानेवारीत रुग्णसंख्या वाढू शकते

सरकारने कितीही एसओपी आणल्या तरी नागरिकांच सहकार्यही महत्वाच

जी हॉटेल्स कोरोनाची तत्व पाळत नाहीत त्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात सरकारला करणार शिफारस

लक्षणं आढळली तर तातडीनं चाचणी करा. माझ्या आईवडिलांनाही कोरोनाची लागण, त्यांच्यावर जीएमसीत उपचार सुरु

यूकेहून राज्यात दाखल झालेल्यांमध्ये नव्या स्ट्रेनचा संसर्ग नाही

चाचण्या करण्याची क्षमता वाढवणार, आरटीपीसीआर टेस्ट करणाऱ्या दोन नव्या मशीन घेणार, १ उत्तर तर १ दक्षिण गोव्यात

पत्रकारांनीही मास्क घालणं गरजेचं, जीव धोक्यात घालून आम्ही काम करतो – आरोग्यमंत्री

मी आतापर्यंत 22 आरटीपीसीआर टेस्ट केल्या आहेत

20 टक्के लोकांचा मृत्यू उशिरा उपचार घेतल्यानं, वेळेत उपचार घेतल्यास मृत्यू प्रमाण होणार कमी

आमच्या चांगुलपणाचा पर्यटकांनी फायदा उचलू नये, महाराष्ट्राप्रमाणे कडक एसओपी लागू करण्याची गरज, कोरोनाची दुसरी लाट आली तर कंट्रोल करणं कठीण

जर लोकांनी मास्क, सोशल डिस्टंन्सिंग पाळलं नाही तर राज्यात पुन्हा कोरोना वाढेल

कोरोनाची दुसरी लाट आली तर कंट्रोल करणं कठीण, किनारी भागात जावं, पण सोशल डिस्टन्सिंग पाळून

आम्ही नव्या स्ट्रेनबाबत तयारी ठेवली पाहिजे, लोकांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे

पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!