पावलू ट्रॅव्हल्सचे मारियो परेरा कोविडमुळे कालवश

हजारो लोकांना दिला रोजगार. अंत्ययात्रेवेळी बसचालकांनी हॉर्न वाजवून लाडक्या मालकाला दिली मानवंदना.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

म्हापसा : पावलू ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून देशभर प्रवासी वाहतुकीचे जाळे उभारणारे म्हापशाचे सुपुत्र मारियो सुकूर परेरा (62) यांचं करोनामुळे निधन झालं. पावलू ट्रॅव्हल्समधून त्यांनी हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला.

परेरा यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारही चालू होते. मात्र त्यातून ते सावरू शकले नाहीत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मायरन असा परिवार आहे. परेरा यांच्या निधनानंतर ”गोव्याचा खरा सुपुत्र हरपला,” अशा भावना सर्व थरांतून व्यक्त होत आहेत.

परेरा यांनी पावलू हॉलिडे मेकर्सच्या ब्रँडखाली पावलू ट्रॅव्हल्स ही प्रवासी वाहतूक करणारी कंपनी सुरू केली. गेली वीस वर्षे ही कंपनी दक्षिण भारतातील राज्ये व महाराष्ट्रात गोव्याची ओळख बनली आहे. गोव्यात जायचं असेल, तर पावलू ट्रॅव्हल्सनेच, असं हक्काने सांगणारे हजारो प्रवासी आहेत.

ट्रॅव्हल्स बसेसची विशेष मानवंदना…
मारियो परेरा यांचं पार्थिव शववाहिकेतून अंत्यसंस्कारांसाठी नेण्यात आलं. या अंत्यायात्रेवेळी पावलू टॅव्हल्सच्या सर्व लक्झरी बसेस एका रांगेत शववाहिकेच्या मागून सोडण्यात आल्या. बसचालकांनी सलग हॉर्न वाजवत आपल्या लाडक्या मालकाला विशेष मानवंदना दिली. या संबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

पाहा व्हिडिओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!