‘पत्रकारितेतील वाटचाल’ नव्या पिढीसाठी दिशादर्शक : ढवळीकर

ज्येष्ठ पत्रकार गंगाराम म्हांबरे यांच्या पुस्तकाचे पणजीत प्रकाशन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: ज्येष्ठ पत्रकार गंगाराम म्हांबरे यांनी ‘पत्रकारितेतील वाटचाल’ या पुस्तकाच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारितेसह राज्यातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक निश्चित दिशादर्शक ठरेल, असा विश्वास राज्य माहिती आयुक्त संजय ढवळीकर यांनी व्यक्त केला. गोवा श्रमिक पत्रकार संघटनेच्या (गुज) पाटो-पणजी येथील कार्यालयात मंगळवारी आयोजित पुस्तक प्रकाशनात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत, ‘गुज’चे अध्यक्ष राजतिलक नाईक आणि लेखक गंगाराम म्हांबरे यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.

हेही वाचाः राज्यात भाजीचे दर वाढण्याची शक्यता

३० वर्षांच्या पत्रकारितेतील अनुभव पुस्तक रुपात वाचकांसमोर सादर

सुमारे ३० वर्षांच्या पत्रकारितेतील अनुभव आणि आठवणी म्हांबरे यांनी पुस्तकरूपाने वाचकांसमोर सादर केल्या आहेत. गोव्यातील पत्रकारितेचे अनेक कंगोरे उघडून दाखवले आहेत. त्यामुळे पुस्तक वाचताना वाचक अंतर्मुख होतो, असंही ढवळीकर म्हणाले.

हेही वाचाः द अ‍ॅक्सिडेंटल जर्नालिस्ट’चे उद्या प्रकाशन

म्हांबरेंनी आपल्या मातीशी असलेली नाळ कधीच तोडली नाही

पत्रकारितेतील जवळपास सर्वच महत्त्वाची पदं उपभोगत असताना गंगाराम म्हांबरे यांनी आपल्या मातीशी असलेली नाळ कधीच तोडली नाही, असं राजतिलक नाईक यांनी नमूद केलं.

हेही वाचाः नुकसानीची पहाणी केली; मदत कधी?

ग्रामीण वार्ताहर ते संपादक या प्रवासात महत्त्वाची पदं भूषवली

गंगाराम म्हांबरे यांनी ‍पत्रलेखक, ग्रामीण वार्ताहर ते संपादक या प्रवासात महत्त्वाची पदं भूषवत असताना संयमी पत्रकारिता कशी असते, याचं उदाहरण घालून दिलं आहे. पत्रकारितेतील अनेक घटक कायम दुर्लक्षित राहतात. पण, म्हांबरे यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून छुपे घटक उजेडात आणले. त्यामुळे या पुस्तकाची उंची आणखी वाढली आहे, असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत म्हणाले.

हेही वाचाः देशातील आकर्षक विमानतळांमध्ये गोवा विमानतळाचा समावेश

सिद्धार्थ कांबळे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

हा व्हिडिओ पहाः Video | Crime | Rape | पोलीस असल्याचा बहाणा करत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!