गोव्यात यायच्या विचारात आहात? पत्रादेवी चेक पोस्टवर होतेय अशी तपासणी…

चेकपोस्ट पोलिसांकडून खबरदारी

मकबूल | प्रतिनिधी

पत्रादेवी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातील गोव्यात थेट प्रवेश दिला जात होता. मात्र हायकोर्टाने फटकारल्यानंतर कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली. त्यानंतर आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली जरी असली, तरीही गोव्यात आता प्रवेश देताना विशेष खबरादारी घेतली जात आहे. गोव्यात येणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे तपासणी करुन मगच गोव्यात प्रवेश दिला जातो आहे. सध्या गोव्यात येण्यासाठी पत्रादेवी चेकपोस्टवरुनच प्रवेश करावा लागतो. या चेकपोस्टवर प्रवाशांनी कसून तपासणी केली जाते आहे.

गोव्यात येणाऱ्यांची संख्या वाढतेय!

गोवा आणि महाराष्ट्र सीमेवर परराज्यातील वाहनं गोव्याच्या दिशेने येण्याचं प्रमाण वाढलंय. कोरोना महामारी अजूनही संपलेली नाही. अशातच पर्यटकांसह गोव्यातील माणसे महाराष्ट्र किंवा अन्य राज्यात राहणारे गोयेकर आपल्या राज्यात परतताना दिसत आहेत. त्याचबरोबर पर्यटकही मोठ्या प्रमाणात गोव्यात प्रवेश करत आहेत. मात्र त्यांना गोव्यात प्रवेश हवा असेल तर पत्रादेवी चेक पोस्टवर अडवलं जातंय. कोरोना चाचणीचं निगेटिव्ह सर्टिफिकेट किंवा कोविड लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा पुरावा असेल तरच लोकांना थेट गोव्यात प्रवेश दिला जातोय.

हेही वाचा : पावसाची खबरबात! आज रेड तर उद्या परवा ऑरेंज अलर्ट

टेस्ट करुन या, नाहीतर…

जर गोव्यात येणाऱ्या व्यक्तीकडे या दोन्हीपैकी काहीही नसेल तर त्यांना सध्या तरी पत्रादेवी चेक नाक्यावर कोविड चाचणी करून घ्यावी लागते. या दरम्यात जर ती व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आढळून आली, तर त्यांना प्रवेश दिला जात नाही. दरम्यान, अनेकांची कोविड चाचणी चेकपोस्टवर केली जात असून यासाठी लोकांची रांग लागल्याचं चित्रही पाहायला मिळालंय. या चेकपोस्टवर पोलिस, सरकारी आरोग्य केंदाचे कर्मचारी, आर टी ओ आणि अबकारी अधिकारीही तैनात आहेत. त्याचबरोबर केरी -आरोंदा, न्हयबाग-सातार्डा चेकनाका बंद आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांनाही रोज पत्रादेवी मार्गाने ये जा करावी लागतेय.

हेही वाचा : Video | महापुराचा वेढा, पहिल्या मजल्यापर्यंत चिपळुणात पुराचं पाणी

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!