जीएमसीत कोविड रुग्ण अजूनही जमिनीवरच

जीएमसीच्या वॉर्ड 145 मधील व्हिडिओ वायरल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोविड रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्याचा फटका आरोग्य सेवेलाही बसतोय. 150 बेड्सची सुविधा असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करूनही जीएमसीत रुग्णांना अजून जमिनीवरच झोपून उपचार घ्यावे लागतायत. हे आम्ही सांगत नाही आहोत, तर तसं दाखवून देणारा जीएमसीच्या वॉर्ड 145 मधील एक व्हिडिओ समोर आलाय. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसारखी सेवा सुरू करूनही जर रुग्णाला अजून जमिनीवर झोपून उपचार देण्याची वेळ येतेय, तर ही निश्चितच दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!