खासगी जमिनीतील वाट अडवली; गुळेलीत संताप

Goan Varta Live | प्रतिनिधी
वाळपई : गुळेली सत्तरी येथील एका खासगी जागेच्या मालकाने आपल्या जमिनीतून जाणारी पारंपरिक वाट अडवली आहे. यामुळे गुळेलीतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुळेली ग्रामस्थ म्हादई नदीवर जाण्यासाठी वापर करत असलेली वाट खासगी जमिनीतून जाते. जमीन मालकाने या पारंपरिक वाटेवर कुंपण घालून ती बंद केली आहे. या वाटेवरूनच गणपती विसर्जन, सरस्वती विसर्जन मिरवणूक नदीवर नेली जाते. धार्मिक कार्यक्रमावेळी नदीचे पाणी कलशातून याच वाटेने आणले जाते. नदीतील पाणी आणण्यासाठी व कपडे धुण्यासाठी नदीवर जाण्यासाठी याच वाटेचा उपयोग करत असत. आता ही कुंपण घालून बंद केल्याने ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे.
सध्या हे प्रकरण वाळपई मामलेदार कार्यालयापर्यंत पोहोचले असून मामलेदार कार्यालय काय निर्णय देते याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. आता सरस्वती पूजनानंतर मूर्ती विसर्जनाचा प्रश्न येणार आहे.
हेही वाचा –
घरामागेच कशी काय फुलवली ड्रग्जची शेती?
पोर्तुगिजांनी दिले आणि स्वकीयांनी हिसकावले
नया है यह! खाताना मास्क नाही काढायचा फक्त चैन उघडायची