सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणः विच्छेदनावेळी सिद्धीचा व्हिसेरा न ठेवल्यामुळे पेच

आता सखोल तपास हाच एकमेव पर्याय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी/म्हापसा: सिद्धी नाईकच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले आहेत. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवताना पोलिसांनी ती आत्महत्या असल्याचं नमूद करून गोमेकॉत पाठवला होता. त्यामुळे हॉस्पिटलच्या शवविच्छेदन विभागाने तिचा व्हिसेरा ठेवलेला नाही. अर्थात आता पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यासाठी कुठलाच मार्ग नाही. त्यामुळे पूर्वीच्या शवविच्छेदन अहवालावरच वैद्यकीत पॅनल नियुक्त करून निष्कर्ष काढण्याची वेळ येऊ शकते.
पोलिसांनी गोमेकॉकडे व्हिसेराबाबत विचारपूस केली आहे. तसं लेखी निवेदन पोलिसांनी गोमेकॉला पाठवलं आहे. पण पोलिसांनीच आत्महत्या म्हटल्यामुळे गोमेकॉने व्हिसेरा ठेवलेला नाही, अशी माहिती मिळाली आहे. एकूणच सिद्धी नाईक हिच्या मृत्यूप्रकरणी पोलीस तपासात जे निष्पन्न होईल त्यावर किंवा सरकारने शवचिकित्सा अहवालावर मत मागवण्यासाठी पॅनल नियुक्त केलं, तर त्या पॅनलचा निष्कर्ष एवढंच आता करता येईल. त्याशिवाय दुसरा मार्ग राहिलेला नाही. एकूणच सिद्धीच्या मृत्यूचा गुंता आणखी वाढला आहे.

हेही वाचाः सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणः आता नेरूलमध्ये पोलिस करणार तपास

प्रकरण बनलं गुंतागुंतीचं

बुधवार, ११ ऑगस्ट रोजी सिद्धी बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी १२ ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह कळंगुट समुद्र किनाऱ्यावर सापडला होता. तिच्या अंगावरील कपडे कुठे गेले, त्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. कुटुंबाने सुरुवातीला पोलिसांना काहीच स्पष्ट माहिती न दिल्यामुळे पोलिसांनीही प्रकरण आत्महत्या, असे गृहीत धरून शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे दिला होता. हे प्रकरण कोणीच आधी गंभीर न घेतल्यामुळे आता गुंतागुंतीचं झालं आहे.

सखोल तपास हाच पर्याय

कुटुंबाने आपली जबानी फिरवल्यानंतर पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाला. आता पोलिसांनी व्हिसेरासंदर्भात गोमेकॉकडे चौकशी केली. मात्र, व्हिसेराही ठेवलेला नसल्याने आता या प्रकरणात सखोल तपास हाच एक पर्याय राहतो.

हेही वाचाः CRIME | कांदोळीत अज्ञाताचा मृतदेह सापडला

सिद्धीच्या मृत्यूचं गुढ अन् अनुत्तरीत असंख्य प्रश्न

सिध्दी नाईक पर्वरीला न जाता समुद्रकिनारी कशी पोचली?

म्हापसा बस स्थानकावरील सीसीटीव्ही बंद असल्यानं ती बस स्थानकावर होती की नाही ?

बुडून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट; मात्र अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानं ती पाण्यात कशी सापडली? तिच्या अंगावरील कपडे कुठे गेले?

घराबाहेर पडल्यानंतर सिद्धी पर्वरीला जाण्याऐवजी कळंगुटला कशी काय पोहोचली?

जर तिला आत्महत्या करायची होती, तर तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत का आढळला?

सिद्धी नाईकचा बुडून जीव गेला असेल, तर तिला पाण्यात कुणी ढकललं होतं?

मोबाईल फोन घरी ठेवून सिद्धी घराबाहेर का पडली असेल?

फेसबुक आणि व्हॉट्सऍप डीलीट करुन सिद्धी नेमकं काय लपवू पाहत होती?

मानसिक तणावाखाली असलेल्या सिद्धीवर कुणाचा दबाव होता?

19 वर्षीय सिद्धीसोबत असं काय घडलं होती की जे ती घरच्यांपासून लपवत होती?

सिद्धीचा घरच्यांसोबत नेमका काय वाद झाला होता?

घरच्यांनी सिद्धीचा मोबाईल फोन का काढून घेतला होता?

हा व्हिडिओ पहाः VIDEO | Girls Safety | गोव्यातील मुलींना राज्यात सुरक्षित वाटतंय का?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!