पर्तगाळ मठाधीश विद्याधिराज वडेर स्वामीजींचे महानिर्वाण

वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संजय कोमरपंत | प्रतिनिधी

काणकोण : पर्तगाळ, काणकोण येथील विद्याधीराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजीचे वयाच्या ७७व्या वर्षी सोमवारी सकाळी ११.३०च्या दरम्यान पर्तगाळ येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने महानिर्वाण झाले.मठाधिशाच्या ४५ वर्षाच्या कारकिर्दित त्यानी पर्तगाळ मठाला मान मिळवुन दिला.१९४५ साली त्यांचा जन्म कर्नाटक कुंदापुर गंगोळी येथे झाला. त्यानी कुंदापुर येथील महविद्यालयात वाणिज्य शाखेची पदवी घेतली. १९६७ साली मुंबई वडाला मठात द्वारकानाथ स्वामीनी त्याना सहा वर्षे शिक्षादान केले. १९७३ साली ते पर्तगाळ मठाचे पीठाधीश झाले. पीठाधीश झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्या नावे विविध क्षेत्रात उच्च शिखर गाठलेल्या सारस्वत समाजाच्या ४५ मान्यवरांना विद्याधीराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

देशभरात पर्तगाळ मठाचे ३३ मठ असून श्रीपाद वडेर स्वामीजीने अकरा मठ बांधले. पनवेलमध्ये शांतिकुंज या वृद्धाश्रमात वृद्धाची सेवा केली जाते. शिक्षणाशिवाय सारस्वत समाज पुढे जाणार नसून सारस्वत समाजाच्या विद्यार्थाना शिक्षणाकरीता अडचणी येऊ नयेत याकरिता बेळगाव व हुबळी येथे हॉस्टेले बांधली.बंगळूर अनंतनगर येथे आठ कोटी रुपया खर्चून महिला करीता हॉस्टेल बांधले. कर्नाटकात सारस्वत समाजाची ६५ मंदिरे कर्नाटक सरकारच्या अख्यतारित होती. ती त्यानी पर्तगाळ मठाच्या अख्यतारित आणली.

स्वामीजीच्या महानिर्माणाची माहिती मिळताच त्याचे अंतिम दर्शन घेण्याकरीता गोवा तसेच कर्नाटकातील मान्यवर मठवास्तूत उपस्थित होते.स्वामीजीना समाधी देण्याकरीता कर्नाटकातील धार्मिक गुरु मठात उपस्थित झाले असून त्यानी धार्मिक विधिला प्रारंभ केला आहे. रात्री १२ वाजेपर्यंत स्वामीजींना समाधी देण्यात येईल. २८ जुलैला स्वामीजीचा चातुर्मास होता. आता तो पुढे गेला असून नव्या विद्याधीश तीर्थ स्वामीजीचा पिठारण सोहळा काही दिवसानी होणार आहे.

स्वामीजीचे अंतिम दर्शन घेण्याकरीता विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, मठ संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, काणकोणचे आमदार इज़िदोर फर्नाडिस,भाई नाईक, राजन कुंकळेकर, पुत्तु पै , माजी आमदार विजय पै खोत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी सांगितले की,

विद्याधिराज तीर्थस्वामीजीचा १९७३ पीठाअभिषेक झाला त्यानी कित्येक मठाचा जीर्णोधार केला. समाजामध्ये शिस्त व एकी घडविण्याचे, समाजा- समाजामध्ये संबंध वाढविण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी आपल्याच समाजाकरीता कार्य केलेले नसून बहुजन समाजाकरिताही कार्य केलेले आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पनवेल येथील शैक्षणिक संस्था व वृद्धाश्रम आहे. त्यांनी मठाच्या अनुयायांचा विश्वास संपादन केला. स्वामीजीना या मठाच्या इतिहासात प्रथमच जास्त कार्यकाळ मिळाला व त्यानी समाजाचा उत्कर्ष केला.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्यावतीने काणकोणचे आमदार इज़िदोर फर्नाडिस यानी स्वामीजीचे दर्शन घेउन दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, स्वामीजी आणि आपले संबंध सलोख्याचे होते. स्वामीजी हस्ते आपला सत्कारही झाला होता. तो क्षण आपण विसरु शकत नसल्याचे सांगून त्यांनी दुःख प्रकट केले. यावेळी मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यानी स्वामीजीच्या या ४५ वर्षाच्या कार्यकाळतील स्वामीजीनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली व दुःख व्यक्त केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!