मडगावात कासा मिनेझिस इमारतीचा काही भाग कोसळला

Goan Varta Live | प्रतिनिधी
मडगावः यावर्षी पावसाने राज्याला अक्षरशः झोडपून काढलंय. मागच्या आठवड्यात राज्यात पूर स्थिती निर्माण होऊन अनेकांचं मोठं नुकसान झालं. काहींच्या डोक्यावरचं छप्पर या पूराने हिरावरून घेतलं. ग्रामीण भागातील जनजीवन पूराने आणि पावसाने विस्कळीत केलं. तर शहरी भागातही मुसधार कोसळलेल्या या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं पहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी पणजीत एक जुनी इमारत कोसळून पडलेल्याचं ऐकिवात असताना आता मडगाव मडगावात एका इमारतीचा काही भाग कोसळून पडण्याचा प्रकार घडल्याचं समोर येतंय.
हेही वाचाः पर्तगाळी जीवोत्तम मठात सुरू झाले नवे पर्व
कुठे पडली इमारत?
शनिवारी पहाटे मडगावात एका जुन्या इमारतीचा काही भाग कोसळून पडण्याचा प्रकार घडलाय. ही इमारत मडगावच्या गांधी मार्केट जवळ असल्याचं समजतंय. कासा मिनेझिस असं या इमारतीचं नाव असून ही इमारत पोर्तुगीज काळातील असल्याचं कळतंय. इमारत फार जुनी असल्याने तिच्या काही भाग शनिवारी पहाटे जमिनदोस्त झालाय.
हेही वाचाः एकच पक्ष, एकच झेंडा, एकच विचार !
सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही
या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचं समजतंय. त्याचप्रमाणे कुणालाही दुखापत झालेली नाही. इमारतीचा जो भाग कोसळला तिथे सुदैवाने त्यावेळी माणसं नसल्यानं थोडक्यावर निभावलंय. मात्र यात थोड्याफार सामानाचं नुकसान झालं असल्याचं सांगितलं जातंय.
हेही वाचाः लोकशाहीचा मार्गदर्शक हरपला ; ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन
काही दिवसांपूर्वी पणजीतील जुनी इमारत कोसळली होती
14 जुलै रोजी पावसाचा जोर कायम असताना राजधानी पणजीतील महात्मा गांधी मार्गाशेजारील जुन्या इमारतीचा एक भाग कोसळला होता. गीता बेकरीच्या जवळ असलेल्या या इमारतीचा एक भाग दुपारी क्षणार्धात जमिनदोस्त झाला होता. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत किंवा कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती.