परिमल राय ईमेल हॅक प्रकरणः यूपीतून संशयितांना आणलं गोव्यात

२५ हून अधिक मोबाईलचे सीमकार्ड, दहाहून अधिक मोबाईल आणि टॅबलेट जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः परिमल राय यांचा ईमेल हॅक करुन पैसे उकळण्याचा कट रचणाऱ्यांना अखेर यूपीतून गोव्यात आणण्यात आलंय. रविवारी गोवा क्राईम ब्रांचनं यूपी या दोघांना अटक केली होती.

मुख्य सूत्रधाराला आणलं गोव्यात

सायबर रॅकेटप्रकरणी मोठी कारवाई गोवा क्राईम ब्रांचनं केली होती. यातील मुख्य सूत्रधाराला अखेर गोव्यात आणलंय. यूपीतील बरेलीतून त्याला गोवा पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीनं अटक केली होती. याप्रकरणी मुख्य सूत्रधार शिवकुमार गँगवार आणि गुलाम गौस यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची आता कसून चौकशी सुरु आहे.

२५ हून अधिक मोबाईलचे सीमकार्ड, दहाहून अधिक मोबाईल आणि टॅबलेट जप्त

सायबर रॅकेटचा मास्टर माईंड शिवकुमार गॅगवार आणि गुलाम गौम्स त्यांच्याकडून २५ हून अधिक मोबाईलचे सीमकार्ड, दहाहून अधिक मोबाईल आणि टॅबलेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देखील पोलिसांननी जप्त केल्या आहेत. याशिवाय कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झालेले ५० हून अधिक बँक खात्यांची माहिती गोळ्या करण्यात आली आहे.

क्राईम ब्रांचच्या सायबर विभागात तक्रार दाखल

या प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांनी क्राईम ब्रांचच्या सायबर विभागात तक्रार दाखल केली होती. अज्ञात व्यक्तीने आपला ई-मेल एड्रेस हॅक करून बनावट ई-मेल तयार केला. या ईमलेद्वारे मित्र आणि इतरांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रारही देण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच तपासही सुरु करण्यात आला होता. या प्रकरणी संशयित उत्तर भारतातून व्यवहार करत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, गोवा पोलिसांची एक टीम उत्तर भारतात चौकशी करण्यासाठी रवाना झाली होती. त्यानंतर गोवा पोलिसांच्या सायबर विभागाच्या तसेच दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेशातील बरेली पोलिसांची मदत घेत सायबर गुन्ह्याचा मास्टर माईंड शिवकुमार गॅगवार आणि गुलाम गौम्स या दोघांना अटक करण्यात आली.

संशयितांना आणलं गोव्यात

या दोन्ही संशयितांना शनिवारी रायबरेली येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला होता. दरम्यान या दोन्ही संशयित आरोपींना घेऊन क्राईम ब्रांचचं पथक गोव्यात दाखल झालंय. या कारवाईमुळे इतर राज्यांतील वेगवेगळ्या गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता आहे. यात आणखीन संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जातेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!