होंडा भागातील लोकांसाठी पेपर मिल कारखाना ठरत आहे डोकेदुखी!

आम्हाला कंपनीत नोकरी नको, पण प्रदूषण नियंत्रणात आणा अशी स्थानिकांची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युुरो रिपोर्टः पर्ये मतदारसंघातील महत्त्वाची पंचायत महणजे होंडा पंचायत. पण मागील काही दिवसांपासून पेपर मिल कारखाना येथील लोकांसाठी डोकेदुखी बनला आहे. लोकांचा या कारखान्याला विरोध होता. तरीसुद्धा येथील लोकांना विश्वासत न घेता हा कारखाना अक्षरशः लोकांवरती लादण्यात आला आहे, असं येथील स्थानिक लोक म्हणतात.

हेही वाचाः शैक्षणिक व्यवस्थेला पुनर्विचाराची गरज: पिल्लई

स्थानिक लोकांना सहन करावा लागतोय त्रास

हा कारखाना येथे आला तेव्हा स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन माहिती देणं आवश्यक होतं. पण येथील लोकांना नजर अंदाज करण्यात आलं. पण त्याचा त्रास आज येथील स्थानिक लोकांना भोगावा लागत आहे. याचा फटका खास करून होंडा वडाकडे, सालेली, भुईपाल, शांतीनगर तसंच होंडा भागातील इतर गावांना होत आहे. आज येथील स्थानिक लोक नारे देत आहेत, की आम्हाला त्या कंपनी मध्ये नोकरी नको, पण प्रदूषण नियंत्रणात आणा, आमचा जीव आम्हाला महत्त्वाचा आहे, अशी येथील स्थानिकांची मागणी आहे.

जनतेला न्याय मिळवून द्यावा

होंडा पंचायतीचे सर्व पंच सदस्य आणि स्थानिक आमदारांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज स्थानिक लोकांचे जीवन धोक्यात आला आहे. गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा राज्याचे माननीय आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना कळकळीची विनंती आहे, की त्यांनी या विषयावर अभ्यास करून लवकरात लवकर येथील जनतेला न्याय मिळवून द्यावा आणि लोकांचा जीवन वाचवावा, अशी विनंती भुईपाल होंडा येतील लक्ष्मण झोरे यांनी केलीये.

हा व्हिडिओ पहाः Video | IPS | LADY SINGHAM | आयपीएस अस्लम खान गोव्याच्या पोलिस उपमहानिरीक्षक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!