Panchayat Election Live Update | राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानास सुरुवात…

१८६ पंचायतींच्या १,५२८ प्रभागांसाठी निवडणुका ; ५,०३८ उमेदवार आजमावणार नशीब

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : राज्यात १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ५,०३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांत बंदिस्त होणार असून, त्याचा फैसला येत्या शुक्रवारी होणार आहे.
हेही वाचा:Panchayat Election Update | पंचायत निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज!

७,९७,०२० मतदार मतदानाचा अधिकार बजावणार

राज्यात १८६ पंचायतींच्या १,५२८ प्रभागांसाठी निवडणुका होत आहेत. परंतु, त्यातील ६४ प्रभागांतील उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे १,४६४ प्रभागांत ५,०३८ उमेदवारांत निवडणुका होत आहेत. निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातून ३,८५,८६७ आणि दक्षिण गोव्यातून ४,११,१५३ असे एकूण ७,९७,०२० मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. दोन्ही जिल्ह्यांत मिळून १,०४९ मतदानकेंद्रे असून, त्यातील ४५ केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
हेही वाचा:Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात ‘या’ नेत्यांची वर्णी…

दुपारी दोन वाजेपर्यंत राज्यात एकूण 55 टक्के मतदान 
केपे 64.65, धारबांदोडा 65.50, सांगे 65.39, बार्देश 56.52, काणकोण 64.85, सासष्टी 51.15, सत्तरी 68.87, मुरगाव 53.19, डिचोली 62.93, तिसवाडी 54.98%

१८६ पंचायतींसाठी मतदान सुरू. सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत १९ टक्के मतदान.
सकाळच्या सत्रात सत्तरीत २१.०५, सांगेत २२.१७ टक्के मतदान पूर्ण
धारबांदोडा २०.८५, काणकोण २२.९२, सासष्टी १६.७८ तर डिचोलीत १९.७६ मतदान

कुठ्ठाळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीन मध्ये मतदान करण्यासाठी जाताना वयोवृद्ध

हरमल वॉर्ड क्रमांक ७ चे दिव्यांग उमेदवार कृणाल ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

डिचोली आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी बजावला मतदानाचा हक्क

कुळे पंचायतीत मतदानाला सुरुवात, प्रभाग क्र. 9 च्या उमेदवार अश्विनी देसाईंनी बजावला मतदानाचा हक्क

मांद्रेत माजी आमदार दयानंद सोपटेंनी बजावला मतदानाचा हक्क

कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनी बजावला मतदानाचा हक्क

पेडण्याचे आमदार प्रविण आर्लेकर यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांनी बजावला मतदानाचा हक्क

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!