स्टिरीओ सिस्टम चोरणारे तिघे गजाआड, पणजी पोलिसांची कारवाई

18 कार फोडून 8 लाखांच्या स्टिरीओ स्टिस्टमची केलेली चोरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : महागड्या गाड्यांमधून स्टिरिओ स्टिस्टम लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या अखेर मुसक्या आवळल्यात. पणजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तिघांना पणजी पोलिसांनी अटक केलीये.

यातील तिघेही जण हे महाराष्ट्रातील राहणारे असून त्यातील दोघेजण हे मूळचे यूपीतील असल्याचीही माहिती समोर आली आहे. जुबेर, जगन्नाथ आणि प्रदीप अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. इतकंच काय तर चोरीतील सर्व सामान आणि चोरीसाठी वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. उत्तर गोव्यात कार फोडून स्टिरीओ सिस्टम चोरणाऱ्यांनी गेले काही दिवस नुसरा धुमाकूळ घातला होती. म्हापसा, पणजी आणि पर्वरी पोलीस हद्दीत रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या 18 आलीशान कार फोडण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – कसिनो खुले करणे करोनाच्या तिसऱ्या लाटेस आमंत्रण ठरेल

या टोळीनं 18 आलीशान गाड्यांमधन तब्बल 8 लाख रुपयांच्या स्टिरीओ सिस्टमची चोरी केली होती. या टोळीच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतली होती. 19 ऑगस्टपासून शनिवारी पहाटे 21 ऑगस्ट या दरम्यान चोरट्यांना अनेक आलिशान गाड्यांमधील स्टिरिओ सिस्टमवर हात साफ केला होता. इतकंच काय तर हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या गाडीवरही डल्ला मारला होता. याप्रकरणी अनेकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अखेर या चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.

हेही वाचा – घरात पडून असलेल्या सोन्यातून व्याजाची कमाई ; वाचा RBI चा नियम

थोडक्यात पण महत्त्वाचं –

म्हापसातील वेगवेगळ्या भागातून 9 जणांच्या गाड्यांवर डल्ला
फेअर आल्स मधील 5, पर्रातील 2 तर म्हापसा शहरातील 2 गाड्यांमध्ये चोरी
एकट्या म्हापसा तालुक्यात साडे 4 लाखापेक्षा जास्तीची चोरी
क्रेटा, आयटेन, किया सोनेट, इग्निझ, स्कॉर्पियो, आयटेन गाड्यांवर डल्ला
आल्त-पर्वरीतील 4 गाड्यांमधून १ लाखापेक्षा जास्त किंमतीची स्टिरिओ सिस्टम चोरीला
दोन रात्रींत एकूण 18 कार फोडून 8 लाखांच्या स्टिरीओ स्टिस्टमची चोरी

कुठे कुठे केली होती चोरी?

संशयित चोरट्यांनी फेअराआल्त परीसरातील पाच गाड्या फोडल्या होतया. फिर्यादी सिमॉईस यांची (जीए 03 व्हाय 9451) टोयोटा कारमधील 45 हजारांचा स्टेरिओ, हर्षल दळवी यांच्या (जीए 03 व्हाय 6937) आय टेन कारमधील 50 हजारांचा स्टेरिओ, रमिता गावस यांच्या (जीए 03 झेड 3351) किया सोनेट कारमधील 45 हजारांचा स्टेरिओ, मायरा डिकॉस्ता यांच्या (जीए 03 झेड 1408) मारूती इग्नीझ कारमधील 50 हजारांचा स्टेरिओ, तर प्रकाश केनावडेकर यांच्या (जीए 03 झेड 2400) क्रेटा कारमधील स्टेरिओ, मोबाईल तसंच इतर सामान मिळून 1 लाख 82 हजारांच्या वस्तू चोरल्यात.

महत्त्वाची कारवाई

पर्रा येथे पेट्रोल पंप समोर पार्क केलेली फिर्यादी मविन ब्रिटो यांची (जीए 03 झेड 4504) स्कॉर्पीओ मधील 70 हजारांचे स्टेरीओ आणि हरीश्चंंद्र शिरसाट यांच्या (जीए 03 व्हाय 0953) हुंडाई ग्रॅण्ड आयटेन फोडून चोरट्यांनी स्टेरिओ लंपास केले होते. दरम्यान पणजी येथे चार गाड्या फोडण्याचा प्रकार घडला होता. दादा वैद्य रस्ता येथे निवृत्त न्यायमूर्ती फिर्यादी रामचंद्र बी.एस. खांडोपारकर यांची (जीए 07 एन 1029) वॅगनार कार फोडण्यात आली. आतील 1 लाखांचा स्टेरिओ चोरट्यांनी चोरून नेला. तसंच गाडीची मोडतोड करून नुकसान केलं होतं. ही चोरीची घटना शुक्रवारी 20 रोजी संध्याकाळी 7 ते शनिवारी सकाळी या दरम्यान घडली. शिवाय पणजी परीसरातील अजून तीन ठिकाणी गाड्या फोडून स्टेरिओची चोरी करण्यात आली होती. अखेर तिघांना अटक करुन पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!