राज्यातील पालिका आणि पंचायत पोटनिवडणुका एकत्रच

निवडणूक आयोगाकडून तयारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील ११ नगरपालिका, पणजी महानगरपालिका, नावेली जिल्हा पंचायत निवडणूक आणि राज्यातील १८ पंचायतींच्या २१ प्रभागांच्या पोटनिवडणुका एकाचवेळी घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगानं केली आहे. या सर्व निवडणुकांसाठी निर्वाचन अधिकारी, तसंच सहाय्यक निर्वाचन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पण महत्त्वाचं म्हणजे येत्या १५ दिवसांत त्याविषयीची घोषणा होईल, अशी दाट शक्यता आहे.

कुठे कुठे निवडणुका?

पेडणे, म्हापसा, डिचोली, वाळपई, मडगाव, कुंकळ्ळी, मुरगाव, सांगे, केपे, कुडचडे-काकोडा आणि काणकोण या पालिकांच्या निवडणुका साखळी नगरपालिकेच्या प्रभाग ९मधील पोटनिवडणूक, नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघातील निवडणूक एकाच वेळी घेण्यात येईल. आगशी, मेरशी, भिरोंडा, म्हावशी, पिसुर्ले, हरमल, कोरगाव, मोरजी, कारापूर-सर्वण, मुळगाव, ओशेल, वेर्ला-काणका, बस्तोडा, असोळणा, चिंचणी, नावेली, भाटी, रिवण, वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ये आणि बाळ्ळी-अडणे या पंचायतींमधील रिक्त प्रभागांतील पोटनिवडणुका पालिका निवडणुकीसोबत घेतल्या जातील.

नियुक्त्याही झाल्या

राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी या निवडणुकांच्या अनुषंगानं मतदार याद्या अधिसूचित केलेल्या आहेत. तसंच निर्वाचन अधिकारी यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा –

झुआरीनगरमध्ये अग्नितांडव, 35 लाखांचे नुकसान

CM | बार्देशमधील पाणीप्रश्न लवकरच सुटणार?

सरकारी नोकरी शोधताय? मध्य रेल्वेत निघाल्या 2,500 जागा

जबरदस्त! आठवड्याला ३ सुट्ट्या देण्याच्या मोदी सरकारकडून हालचाली?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!