एकच नंबर | पीएसीही म्हणतंय सुशेगाद गोवा नव्हे सुशासित गोवा!

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : राज्यासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. एक रिपोर्ट जारी करण्यात आलाय. या रिपोर्टमध्ये गोव्यानं पहिला नंबर काढलाय.
कोणता रिपोर्ट?
पब्लिक अफेअर सेंटरने शुक्रवारी पब्लिक अफेअर इंडेक्स जारी केलंय. दरवर्षी पब्लिक अफेअर सेंटर म्हणजेच पीएसी सुशासित राज्य आणि केंद्र शासित राज्यांची यादी जारी करत असतं. यंदाही ही यादी जारी करण्यात आली आहे. यात छोट्या राज्यांमध्ये गोव्यानं पहिला नंबर काढलाय. एक पूर्णांक सात चार पाच इतकं रॅंकिंग गोव्याला मिळालंय.
राज्यातील सरकारसाठी ही गोष्ट कौतुकास्पद मानली जातेय. तीन गोष्टींच्या आधारे हे रॅकिंग तयार केलं जातं. समानता, विकास आणि सातत्यावर हे रेटिंग काढलं जातं. या रेटींगमध्ये गोव्यानं पहिला नंबर काढला असून राज्यासाठी ही बाब अभिमानास्पदच म्हणावी लागेल.
गोव्याखालोखाल कोण?
चंदीगड हा सर्वोत्तम केंद्रशासित प्रदेश असल्याचं पीएसीने म्हटलंय. गोव्यापाठोपाठ मेघालय, हिमाचल प्रदेशचा नंबर लागलंय. तर सर्वात वाईट शिक्का हा मणिपूर, दिल्ली आणि उत्तराखंडला बसलाय.
मोठ्या राज्यांबाबत बोलायचं झालं तर केरळने पहिला नंबर काढलाय. केरळसह दक्षिणेतील तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही राज्य अव्वल ठरली आहेत.
हेही वाचा –
पर्यटकांची मौजमजा येणार अंगलट!
‘हा’ किनारा पर्यटकांचे नव्हे, कासवांचे ‘फेवरीट डेस्टिनेशन’!
मस्तच! धारबांदोड्यातील या महिलांनी झेंडू फुलवून केली भरीव कमाई