प.पु. विनायक अण्णा महाराज निवर्तले

अल्पशा आजारानं निधन ; 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goan Varta Live | प्रतिनिधी

कुडाळ : पिंगुळी येथील प. पु. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचं अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळं कोकणासह गोव्यातील त्यांचे भक्तगण शोकाकुल आहेत. त्यांची समाधी घेण्याची इच्छा होती. त्यानुसार आज सकाळी आठच्या सुमारास समाधी स्थळाजवळ समाधी दिव्याचा विधी प्रारंभ झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळनजीकच्या प.पु. राऊळ महाराज यांचे अण्णा महाराज हे पुतणे. पिंगुळी इथल्या मठाचे ते कार्याध्यक्ष होते. कोकण, मुंबई, गोव्यासह महाराष्ट्र व कर्नाटकात त्यांचा मोठा भक्तगण आहे. दीनदुबळ्यांचे अश्रु पुसणारे आणि सामाजिक कार्यात सतत सहभागी होणारे अण्णा महाराज म्हणजे दिव्य तेज असलेले व्यक्तिमत्व होते. कोकणचे महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हच्या सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. अण्णा महाराज यांच्या निधनानं भक्तगण शोकसागरात बुडालेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!