गोव्यातुन परतणाऱ्या ऑक्सिजन टँकरला तिलारी घाटात अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोडामार्ग : गोव्यातुन कोल्हापूरकडं जाणा-या ऑक्सिजन टॅंकरला तिलारी घाटात अपघात झाला. हा टॅंकर गोवा बांबुळी इथं ऑक्सिजन खाली करून परत कोल्हापूरकडं निघाल्याचं समजतं. टॅंकर रिकामा असल्यानं मोठी दुर्घटना टळली.

तिलारी घाट हा अवजड वाहतुकीसाठी खुपच धोकादायक समजला जातो. तरीही अनेक वाहने धोका पत्करून या घाटातुन प्रवास करताना दिसतात. असाच प्रसंग आज घडला. गोवा बांबुळी इथं ऑक्सिजन खाली करून हा टॅंकर कोल्हापूरकडं परतत होता. एका अवघड वळणावर मात्र या टॅंकर चालकाचा ताबा सुटला आणि टॅकर रस्ता सोडून घसरला.

या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र या घाटातुन चालणा-या अशा धोकादायक वाहतुकीकडं संबंधित विभागानं लक्ष ठेवण्याची मागणी होतेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!