स्पीड ब्रेकर्सची गरजच काय! बेवारस जनावरं आहेत की…

वेबारस जनावरांमुळे वाहतुकीचीही कोंडी

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : डिचोलीत वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजताय. कसलंही नियंत्रण नाही. पार्किंग नीट नाही. याबाबत सतत जागृती होताच या ठिकाणी विशेष ट्राफिक सेल आला खरा. आता काही दिवसांपूर्वी तर चक्क ट्रॅफिक सिग्नल बसवून सर्कल परिसरातील वाहतूक नेटकी व्हावी यासाठी नियोजन झालं. मात्र अजूनही बेवारशी गुरांचा वावर वजा भीती आणि त्यामुळे अपघाताला येणारे निमंत्रण वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

या बाबत पालिका मंडळाने कंबर कसलीये. आतापर्यंत 122 गुरांना गोशाळेत रवाना केलं असलं तरी अजून किमान दीडशेच्या आसपास बेवारशी गुरे शहरात वावरतायत. यामुळे लोकांना स्पीडब्रेकरची गरजच उरत नाही. गुरांना पाहून गाड्यांचा वेग आपसूकच कमी होत असल्याचं पाहायला मिळतंय.

बाजारात ठाण मांडून असलेली ही गुरं आणि म्हशी यांवर तोडगा कधी निघणार हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे ही बेवारशी गुरे डिचोलीतील वाहन चालकांसाठी सतत कटकटीचा विषय ठरत आहेत.

नगराध्यक्ष राजाराम गावकर म्हणतात की..

आम्ही गोशालेशी करार केला आणि 122 गुरे दिली आहेत. उर्वरित पकडून दिली जातील मात्र जे मालक आहेत त्व अकारण पोलीस तक्रार करीत आहेत. मात्र आपली जनावरे बेवारशी सोडून घालताना विचारच करीत नाहीत. त्यामुळे आम्ही आता फोटो काढून पुरावा देत आहोत.

शहरात अजूनही किमान दीडशेच्या आसपास गुरे असून त्यांचा मुक्त संचार सुरुच आहे. बाजारत किमान सात ते आठ गाई प्रसूत होऊन सवत्स धेनु बाजारत वावरत प्लास्टिक आणि इतर कचरा खाताना दिसतात. बैल, रेडे आणि म्हशीही त्यांचे मालक असूनही बेवारशी प्रमाणे रस्त्यावर धिंगाणा घालत असतात. गोशाळेत गुरांची चांगली व्यवस्था होत असली तरी गुरासाठीचे सरकारी अनुदान मंजूर न झाल्याने गोशाळेत त्यांच्या चाऱ्याचा खर्च इतर प्रश्न उपस्थित होत आहेत.

या बाबत सरकारनंही तातडीने आणि गंभीरपणे लक्ष देत गोशाळेत जी जनावरे करारानुसार दिली आहेत त्यांचे आर्थिक अनुदान तातडीने पुरवावे अशी मागणी कमलेश बांदेकर, कालिदास कवळेकर, अजित बिर्जे यांनी केली आहे. पालिकेने गुरांचे मालक पालक शोधण्यासाठी जाहिराती दिल्या पण कुणीच पुढे येत नाहीत अजूनही 150च्या आसपास बेवारशी गुरे पकडून गोशाळेत रवानगी करण्याचं कसब पालिकेला करावे लागणार आहे.

हेही वाचा –

स्वस्त सरकारी कांदा मिळेल तेव्हा मिळेल, पण तोपर्यंत बजेट पार कोलमडणार कारण….

कडक सॅल्युट! ‘त्या’ वाहतूक पोलिसाच्या संयमाचं रहस्य जाणून घ्या

ईएसआय हॉस्पिटलमधील नर्सवर टांगती तलवार, तर डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!