छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला माफी नाही! आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

हणजुण पोलिसांकडून अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. हणजुण पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. हा तरुण बार्देशच्या तारची भाट शिवोली येथील राहणार आहे. त्याचं वय 32 वर्ष असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान, या तरुणानं फेसबुकवर झालेल्या चौफेर टीकेनंतर माफीही मागितली होती. मात्र छत्रपतींचा अपमान केल्याप्रकरणाचा ठपका ठेवून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शिवजयंती समारोह समितीनं याबाबत पोलिसात तक्रार केली होती.

काय आहे प्रकरण?

घटना आहे 19 फेब्रुवारीची. शिवजयंतीनिमित्त कळंगुटमध्ये मिरवणूक काढली जाणार होती. शिवप्रेमी एकवटेलही होते. पण वाद होण्याच्या भीती त्यांना दिलेली परवानगी नाकारण्यात आली. त्यावरुन वादही झाला. पण या वादापेक्षाही एक गंभीर गोष्ट समोर आली आहे. यासंपूर्ण घटनेच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान, एका तरुणानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी एक टिप्पणी केली. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.

कळंगुटमधील शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीवरुन मोठा तणाव पाहायला मिळाला. या सगळ्या घटनेचं फेसबुकलाईव्ह केलं जात होतं. पण धक्कादायक बाब म्हणजे या फेसबुकलाईव्हमध्ये एका तरुणांनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह शब्दांत कमेंट केली आहे. या कमेंटवरुन शिवजयंती समारोह समितीनं आक्षेप घेत थेट पोलिसांत धाव घेतली आहे. नेसेलेस नोरोन्हा असं या तरुणाचं नाव आहे. पेशानं हा तरुण डीजे असल्याचं त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरुन दिसतं.

माफी मागितली, पण…

मिरवणुकीला परवानगी नाकारल्या कळंगुट मधील शिवप्रेमी आधीच संतापले होते. त्यात या फेसबुक कमेंटने आगीत तेल ओतायचं काम केलंय. शिवरायांबद्दल गलिच्छ शब्दांत कमेंट करणाऱ्या या तरुणावर कलम 153अ, 298, 504 आणि 565खाली कारवाई केली जावी, अशी मागणी शिवजयंती समारोह समितीनं केली आहे. तशी लेखी तक्रारही पोलिसांना देण्यात आली होती. आता या तक्रारीवरुन आयटी एक्टच्या अंतर्गत पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.

पाहा गोवनवार्ता लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट –

हेही वाचा –

गोवनवार्ता LIVE विशेष | गोवा आणि शिवाजी महाराज यांचं नातं काय आहे?

शिवाजी महाराजांचे विचार आजही प्रेरणादायी – मुख्यमंत्री

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!