खंडित वीजेचा उत्पादन कारखान्यांना फटका

हिमाचल प्रदेशमधील नागरिकांनी सत्ताबदलाची प्रथा कायम ठेवली

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील औद्योगिक वसाहतींत वारंवार खंडित होणारा 3 वीजपुरवठा, गोव्यात उत्पादन होणाऱ्या स वस्तूंना राज्यात मिळत नसलेले मार्केट, राज्य सरकारकडून मिळत नसलेले पुरेसे पाठबळ, इतर राज्यांपेक्षा कामगारांना मिळणारे अधिक वेतन आदी काही कारणांमुळेच गेल्या काही वर्षांत राज्यातील अनेक कंपन्या बंद झालेल्या आहेत, अशी प्रतिक्रिया औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत.
हेही वाचाःहिवाळी अधिवेशन जानेवारीत

राज्य कारखाने कायदा (फॅक्टरी ऍक्ट ) १९४८ अंतर्गत ३१ मार्च २०२१ पर्यंत नोंदणी झालेल्या १,६२७ उत्पादन कारखान्यांपैकी ८०४ कारखाने विविध कारणांमुळे बंद झालेले आहेत. तर, ८२३ कारखाने सुरू असल्याची माहिती नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन खात्याने जारी केलेल्या अहवालातून समोर आलेली आहे. यासंदर्भातील वृत्त बुधवारी प्रसिद्ध केल्यानंतर ‘गोवन वार्ता’ने अखिल गोवा बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, गोव्यातील उत्पादन कारखान्यांना कच्चा माल इतर राज्यातून आयात करावा लागतो आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनाची विक्रीही गोव्यात मार्केट नसल्याने इतर राज्यांतच करावी लागते. त्यातून संबंधित कारखान्यांना नुकसान सहन करावे लागते.
हेही वाचाःLIQUOR SEIZED | खुर्च्यांच्या ट्रकमध्ये सापडलं दारुचं घबाड

औद्योगिक वसाहतींमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार

दुसऱ्या बाजूने गोव्यात विजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी असले तरी औद्योगिक वसाहतींमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. त्याचा फटका उत्पादन कारखान्याना बसतो. गोव्यातील कामगारांना दिले जाणारे वेतन इतर राज्यांतील कामगारांपेक्षा जास्त आहे . त्यातच त्यांना महागाई भत्ताही द्यावा लागतो. यात उत्पादन कारखान्यांना फायद्यापेक्षा तोटाच अधिक होत असतो. परिणामी, नुकसानीमुळे असे कारखाने बंद केल्याशिवाय व्यवस्थापनांकडे पर्याय उरत नाही. त्यामुळेच कारखाने कायदा १९४८ अंतर्गत नोंदणी केलेले ५० टक्के कारखाने बंद झालेले आहेत, असे त्यांनी सांगितले.

औद्योगिक वसाहतींतील कारखाने बंद पडू लागलेत

राज्य उद्योग संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनीही अनेक उत्पादन कारखान्यांना खंडित वीजपुरवठ्याचा वारंवार सामना करावा लागतो. राज्य सरकारकडून आवश्यक ते सहकार्य त्यांना मिळत नाही. त्यामुळेच औद्योगिक वसाहतींतील कारखाने बंद पडू लागले आहेत, असे मत नोंदवले.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!