पाटबंधारे विभागाला कधी जाग येणार? 15 दिवसांपासून पाण्याची नासाडी
पेडणे रेल्वे स्थानकासमोरील धक्कादायक वास्तव समोर

मकबूल | प्रतिनिधी
पेडणे : आज आम्ही तुम्हाला पेडणे रेल्वे स्थानकासमोरील दृश्य दाखवणार आहोत. त्यातील दृश्य पाहून तुम्हाला वाटेल की हा ओहोळ आहे. पण हा ओहोळ नव्हे. पाटबंधारे खात्याची जलवाहिनी फुटल्याने गेले १५ दिवस पाणी वहात आहे. कोणीही अधिकारी येथे फिरकलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी पेडणे तालुक्यात पाण्याची टंचाई होती. आज हजारो लिटर पाणी वाया जात असताना दिसत आहे. आधीच राज्यात पाण्याची समस्या भेडसावते आहे. अशात पाण्याच्या होणाऱ्या नासाडीला कुणाला जबाबदार धरायचं हा सवाल सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
पाहा व्हिडीओ –
पाण्याची भयंकर नासाडी