पेडण्यात पावसामुळे पडझड
पेडणेत रस्त्यावर झाड पडून वाहतूक खोळंबली. मालपेत घरावर माड कोसळून नुकसान

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी
पेडणे: पावसाच्या तडाख्याने पेडणे सेंट जोसेफ बेकरीजवळ आंब्याचे झाड रस्त्यावर पडून वाहतूक तासभर खोळंबली. झाड पडल्याची बातमी सुधाकर पेडणेकर यांनी अग्निशामक दलाला दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन दिला.
मालपे येथे सुदेश धारगळकर यांच्या घरावर माड कोसळल्याने घराचे बरेच नुकसान झाले. अग्निशामक दलाला पन्नास हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले. अग्निशामक दलाचे अधिकारी जयराम मळीक, डॉमिनिक मार्टिन, शैलेश हळदणकर,सहदेव चोडणकर,विशाल पाटील, आशीर्वाद गाड, रामदास परब,विकास चौहान,प्रज्योत होबळे यांनी बचावकार्यात सहभाग घेतला .