राष्ट्रवादी काँग्रेसचे 50 कार्यकर्ते ‘या’ पक्षात

आगामी विधासनसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून आमदार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

पेडणे : मांद्रे मतदारसंघातील युवा काँग्रेस नेते सचिन परब (Sachin Parab) यांच्या कार्याने आकर्षित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रवेश केला.

काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी कठीण प्रसंगी मांद्रे मतदारसंघात जिवंत ठेवण्याचा यापूर्वी जेष्ठ नेते गोपाळ परब, माजी मंत्री संगीता परब (Sangeeta Parab) आणि आता त्याचाच वारसा त्याचे सुपुत्र सचिन परब चालवत आहे. पक्षाला उभारी देण्याचे काम युवा नेते सचिन परब यांनी आमदार नसतानाही जे कार्य मागच्या 20 वर्षांपासून चालू केले त्याला तोड नाही. पक्षाचा निधी नसतानाही त्यांनी आतापर्यंत पदरमोड करून पक्षाचे कार्य तळागाळातील कार्यकर्त्या पर्यंत पोचवले व पोचवत आहेत. त्याच्या कार्यपद्धतीला आकर्षित होऊन राष्ट्रवादीचे 50 कार्यकर्ते सचिन परब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करून पक्ष बळकट करण्याची प्रतिज्ञा घेतली.

अनेक सत्तारूढ पक्षातीलही कार्यकर्ते सचिन परब यांच्या संपर्कात आहे. तेही टप्याटप्याने काँग्रेस पक्षाकडे येतील अशा आशावाद सचिन परब यांनी व्यक्त केला.

मांद्रे मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला उभारी आणि बळकटी देण्यासाठी सचिन परब यांनी यांनी आपल्या खांद्यावर धुरा घेतलेली आहे. निस्वार्थी भावनेने त्यांनी कार्य चालू केले आहे. आता पन्नास कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे मतदारसंघातून समिकरणांना वेग आलेला आहे.
या विषयी सचिन परब यांनी सांगितले की, आगामी विधासनसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा या मतदारसंघातून आमदार निवडून आणण्यासाठी आपले जोरदार प्रयत्न आहेत. आजपर्यंत या मतदारसंघाचा अपेक्षित विकास झाला नाही . काँग्रेस पक्षाच्या आमदार म्हणून प्रथम संगीता परब मंत्री झाल्या. त्या काळात अनेक युवकांना रोजगार संधी दिल्या. त्यानंतर काँग्रेसचा आमदारही दुसर्‍यादा निवडून आणला त्यांनी विकासापासून पळ काढून आमदारकीचा दिल्लीत जाऊन सौदा करून आमदारकी विकली. पोटनिवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी जाहिर झाली. तरीसुद्धा कार्यकर्त्यांनी आपले नि:स्वार्थी भावनेने काम केले. तरीही पक्षाला यश मिळाले नाही. पोटनिवडणुकीत का पराभव झाला त्याची कारणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माहीत आहे, असे सचिन परब यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस मोरजी जिल्हा पंचायत उमेदवार बेला फेर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली नामदेव तुळस्कर, अनिल साटेलकर आदी मुखय कार्यकर्त्यांनी आपल्या 50 समर्थकासोबत प्रवेश केला.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat), गोवा प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar), नारायण रेडकर, प्रमेश मयेकर, प्रदीप हरमलकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला .

आगामी निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी सचिन परब यांना मिळणार असल्याच्या विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त करून परब यांना निवडून आणण्यासाठी पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांनी निर्धार केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!