आज महालक्ष्मी देवीचा कालोत्सव

एसओपींचं पालन करून दर्शन घ्यावं

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीतील आराध्य दैवत श्री माहालक्ष्मी देवीचा कालोत्सव आज संपन्न होणार आहे.
या निमित्त धार्मिक विधींसह ओटी भरणे, गार्‍हाणे आदी कार्यक्रम होतील. रात्री ८ वाजता गणपतीची आरती केल्यानंतर मळेकर समाजाचा कालोत्सव होणार आहे

या कालोत्सवाला अनेक भाविक हजेरी लावून देवीचं दर्शन घेतात. भाविकांनी कोरोनासंबंधीच्या एसओपींचं पालन करून दर्शन घ्यावं,तोडांला मास्क लावणे आणि सेनिटाईझरचा वापर करणे अनिवार्य आहे. असं आवाहन मळा समितीचे अध्यक्ष दामोदर वायंगणकर यांनी केले आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!