तोल जाऊन वृद्ध महिला विहिरीत पडली, पण थोडक्यात बचावली

काळ आला होता.. पण वेळ आली नव्हती!

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : विहिरीत पडलेल्या एक वृद्ध महिलेला वाचवण्यात यश आलंय. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या महिलेचा सुखरूप बाहेर काढलंय.

कशी पडली विहिरीत?

वेळ सव्वा अकरा वाजताची… कोरगावात गावकर वाडा सरकारी शाळेजवळ असणाऱ्या विहिरीत एक वृद्ध महिला पडली. या गोष्टीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाला कळवण्यात आली. अग्निशमनच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. 72 वर्षांच्या या महिलेला अग्निशमनच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढलं. इंदिरा मंगेश शेटये ही वृद्ध महिला तोल जाऊन विहिरीत पडली होती. गावातील लोकांनीही या महिलेला वाचवण्यासाठी प्रयत्न केलं. गावकऱ्यांच्या मदतीनं या वृद्धेला अखेर जीवदान देण्यात आलं.

अग्निशमन दलाची तत्परता

अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गावस, सहाय्यक अधिकारी जयराम मळीक, प्रशांत धारगळकर, चालक रामदास परब, जवान रतन परब, अमित सावळ, अविनाश नाईक यांनी गावकऱ्यांच्या मदतीनं बचावकार्य केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!