’गोवन्स अगेन्स्ट करोना’ला उत्तर गोव्यात वाढता पाठिंबा

'आप'चा पुढाकार : चिंचिणी येथील शाळकरी मुलीने केले 9 ऑक्सिमीटर दान; ऑक्सिमित्र राज्याच्या कानाकोपर्‍यात

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

पर्वरी : आपचे (AAP) ऑक्सिमित्र राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचून गोवेकरांना करोनाच्या काळजीतून मुक्त होण्यास मदत करीत आहेत. पर्वरी, म्हापसा, कारमोणा या भागात व बार्देश, डिचोली तालुक्यात ’गोवन्स अगेन्स्ट करोना’ मोहिमेला लोकांचा पाठिंबा वाढत आहे.
केवळ लोकांनाच याचा आनंद होतोय असे नव्हे, तर जे कार्यकर्ते यात सहभागी झाले आहेत, त्यांनाही याचा आनंद होत असल्याचे अनेकांनी नमूद केले.

प्रशिक्षण पूर्ण करून तळागाळांत कार्य करणार एक कार्यकर्ता म्हणाला की, आमच्या मदतीमुळे लोकांचे जीव वाचत आहेत आम्हाला आनंद होतोय. या प्रवासात आम्ही अनेकांना भेटलो, अनेकांच्या आयुष्याला स्पर्श केला आणि अनेकांचे आशीर्वाद आणि धन्यवादही घेतले. आमच्या उपक्रमाला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून जे काम सरकारने हातात घ्यायला हवे होते, ते आम्ही करीत असल्याचा आम्हाला आनंद आहे, असेही तो कार्यकर्ता म्हणाला.

करोनाविरुद्धच्या या उपक्रमाविषयी पर्वरी येथील मलायका यांनी आपच्या ऑक्सिमित्रांचे कौतुक केले. आपचे ऑक्सिमित्र हे खूप चांगले काम करीत असून ते फार त्वरित प्रतिसादही देत असल्याचे त्या म्हणाल्या. मलायका आणि त्यांच्या मातोश्री सेलेस यांना आपच्या ऑक्सिमित्रांनी मदत केली. मलायका आणि तिच्या आईने त्यांच्या शेजारी राहणार्‍या एका वयोवृद्ध महिलेला मदत केली जी बाथरूममध्ये पडून जखमी झाली होती व बरेच तास एका जागेवरून दुसर्‍या जागेवर हलू शकत नव्हती. त्यांनी अग्निशमन दलाला बोलावून दार उघडायला व तिला बाहेर काढायला मदत केली. पण नंतर ती बाई करोना पॉझिटिव्ह सापडली आणि आम्ही दोघी आमच्या चाचणी अहवालांची वाट पाहत होतो. त्यावेळी आम्ही आपच्या ऑक्सिमित्रांना फोन केला आणि आमच्या प्राणवायू स्तर तपासण्याची विनंती केली. ऑक्सिमित्र लगेच आले आणि आम्हाला तपासणी करायला मदत केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, असे मलायका म्हणाल्या.

हळदोणा येथील एक स्थानिक म्हणाला की, आपण या मोहिमेबद्दल मी वर्तमानपत्रांमध्ये आणि फेसबुकवरही वाचले होते. सर्वांनी आपला प्राणवायू स्तर तपासणे आवश्यक असून सर्व गोमंतकीय लोकांनी या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे.

पेडणे येथील शशिधर हळर्णकर यांनी याविषयी बोलताना म्हटले, या महामारीमुळे सगळेच काळजीत आहेत. आपण बाहेर जातो त्यावेळी काय होईल याची कुणालाच शाश्वती नसते. आपचे ऑक्सिमित्र आले व त्यांनी ऑक्सिजन स्तर तपासला आणि स्तर सर्वसामान्य असल्याचे कळल्यावर आम्हाला उत्साह वाटला. गोवन्स अगेन्स्ट करोना ही फक्त आम आदमी पक्षाची एकतर्फी मोहीम उरलेली नाही. लोकही या उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत, असे हळर्णकर म्हणाले.

चिंचिणी येथील वेलोनिया बरेटो या शाळकरी मुलीने मोहिमेसाठी मदत म्हणून ऑक्सिमित्रांकडे 9 ऑक्सिमीटर दान केलेले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!