VIDEO | Breaking | मुख्यमंत्र्यांची कोविड वॉर्डला भेट, जीएमसीतील कोविड रुग्ण, नर्स आणि डॉक्टरांशीही बातचीत

जीएमसीतील परिस्थितीचा घेतला आढावा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

बांबोळी : मंगळवारी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी बांबोळीतील जीएमसी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जीएमसीतील कोविड वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची पाहणी केली. त्याचप्रमाणे त्यांनी रुग्णांसोबतच कोविड वॉर्डमधील नर्स, डॉक्टर यांच्याशीही संवाद साधला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बातचीत करताना महत्त्वाच्या विषयांवर वक्तव्य केलं.

हेही वाचा – एका सिलिंडरचे वाटेकरी दोन रुग्ण

ऑक्सिजनबाबत काय म्हणाले?

ऑक्सिजनचा पुरवठा, रुग्णांची होणारी परवड, कोरोनाची तिसरी लाट या सगळ्यासोबतच राजकीय प्रश्नांवरही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना आपली मतं मांडली. कोविड वॉर्डमधील समस्या काय आहे, तिथली परिस्थिती काय आहे, याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. प्रत्येक रुग्णाला चांगले उपचार मिळतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी रुग्णांना दिली. दरम्यान, काही प्रमाणात ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा प्रश्न असला तरी तो लवकरच सोडवला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ऑक्सिजनचा मुबलक साठा राज्यात असला तरी रुग्णांपर्यत तो पोहोचवण्यात काही अडचणी येत आहे. त्यावर काम केलं जात असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा – एका दिवसात 831 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनची विक्रमी वाहतूक

‘हयगय खपवून घेणार नाही’

ऑक्सिजन सिलिंडर वॉर्डपर्यंत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. बहुतेक मी पहिलाच असा मुख्यमंत्री असेल जो कोविड वॉर्डात जाऊन थेट रुग्णांची भेट घेऊन आलो आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, अशा प्रत्यक्षपणे इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. त्याचप्रमाणे जी रुग्णालयं डीडीएसएसव्हायची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय. महत्त्वाचं म्हणजे अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय.

हेही वाचा – याला दिलासादायक आकडा म्हणायचं का? कारण देशात…

ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत जे सेवा पुरवत आहेत, त्यांचीही जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यांनी यावेळेला गरज समजून नव्या तंत्रज्ञानाप्रमाणे सेवा पुरवण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी हात वरुन जबाबदारी झटकणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, असंही मुख्मयंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना नमूद केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!