अकारावीच्या विज्ञान किंवा डिप्लोमासाठीच्या सीईटीचा निकाल जाहीर

८० विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवलेला निकाल आज कळणार?

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : परीक्षा न देताचच दहावीच्या बोर्डाचा निकाल लावण्यात आला. त्यासाठी वेगळ्या प्रकारे मुल्यांकन करण्यात आलं. त्यानंतर विज्ञान आणि व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. गोवा बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येऊ शकेल.

सर्वाधिक ११६ गुण

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालान्त मंडळाने विज्ञान तसेच पदवी शाखांसाठी इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. १२० गुणांच्या या परीक्षेत सर्वाधिक ११६ गुण प्राप्त झाले आहेत. अंतिम क्षणी परीक्षा दिलेल्या ८० विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा : काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामनो! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीचे काँग्रेसला ३ सवाल

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विज्ञान तसेच पदवी अभ्यासक्रमांस प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागते. यंदा या परीक्षेसाठी ६ हजार ८५७ विद्यार्थी बसले होते. त्यांचा निकाल रविवारी जाहीर झाला आहे. हा निकाल https://www.gbshsegoa.net या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सीईटी परीक्षेत विज्ञान आणि गणितावर आधारित प्रत्येकी ६० गुणांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागते. जाहीर झालेल्या निकालात विद्यार्थ्यांनी विज्ञानात ६० पैकी ५७ गुण मिळवले आहेत. तर गणितात पैकीच्या पैकी म्हणजे ६० गुण प्राप्त केले आहेत. हा निकाल मंडळाच्या उपरोल्लिखित संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश देणाऱ्या विद्यालयांनी ही यादी डाऊनलोड करून घ्यावी, असे मंडळाने कळवले आहे.

दरम्यान, अकरावीसाठी लवकरच विद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यंदा अंतर्गत गुणांचे मूल्यमापन करून दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे विद्यालयांना १० ते १५ टक्के अधिक जागा भरण्यास सरकारने अनुमती दिली आहे.

हेही वाचा : डेडलाईन चुकली! 31 जुलैपर्यंत गोव्यात पहिल्या डोसचं १००% लसीकरण झालंच नाही, मग झालं किती ?

ऐनवेळी आलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल आज?

एकूण ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी न करताच शेवटच्या क्षणी सीईटी परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांनी आज शालान्त मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी केले आहे.

हेही वाचा : देर आए दुरुस्त आए! गोव्यात जाण्यासाठी सिंधुदुर्गच्या गाड्यांना अखेर मुभा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!