CCTV | बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार, थरारक फाईट कॅमेऱ्यात कैद

व्हिडीओ धारबांदोतील असल्याच्या चर्चांना उधाण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना नेमकी कुठली घडली, याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी ही घटना धारबांदोडा तालुक्यातील असल्याचं बोललं जातंय. हा व्हिडीओ सोशल मीडियात वायरल झालय.

१ जून रोजी मध्यरात्री १२ वाजल्यानंतरची ही घटना असून यामध्ये एक बिबट्या घराच्या आवारात दिसून आलाय. दरम्यान, घराच्या वऱ्हाडातून खाल उतरल्यानंतर एका भिंतीच्या आडोशाला गेल्यानंतर बिबट्या आणि कुत्र्यांची झटापट झाली. त्यावेळी बिबट्यानं कुत्र्यांचा फडशा पाडलाय. यानंतर दोघांमध्ये घमासान झाल्याचं सीसीट्वीही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. दरम्यान, बिबट्या कुत्र्यावर भारी पडला आणि जखमी कुत्र्याला जबड्यात पकडून बिबट्यानं पळ काढल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा सगळा थरारक प्रकार नेमका धारबांदोडामधीलच आहे का, याला मात्र अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.

हेही वाचा : VIRAL VIDEO | पोपटाने गिटारच्या धूनवर गायलं भन्नाट गाणं

पाहा थराराक व्हिडीओ

हेही वाचा : VIRAL VIDEO | इवल्याशा कासवाने केले  जंगलाच्या राजाला हैराण

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!