निर्दयी बाप! डोक्यात स्टम्प घालून पोटच्या पोरीची हत्या

20 वर्षीय मुलीची हत्या केल्याच्या आरोपावरुन बापाला अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : एका निर्दयी पित्यानं मुलीच्या डोक्यात स्टम्प मारला. यामध्ये मुलीचा मृत्यू झाल्यानं साखळी हादरुन गेलं आहे. संपूर्ण साखळीमध्ये (Sanquelim) या धक्कादायक घटनेने एकच खळबळ माजली आहे.

मूळच्या उत्तर प्रदेशातील एक कुटुंब साखळीमध्ये राहत होते. या कुटुंबातील पित्याला संताप अनावर झाल्यानं त्यानं सगळा राग आपल्या मुलीवर काढला. रागाच्या भरात निर्दयी बापानं स्टम्पने मुलीच्या डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. नेमक्या कोणत्या कारणावरुन मुलीवर पित्यानं हल्ला केला, हे समजू शकलेलं नाही. सध्या पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सुनीलकुमार राजन असं निर्दयी पित्याचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी सुनीलकुमार राजनला ताब्यात घेतलं असून त्यांची डिचोली पोलिस कसून चौकशी करत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे सुनीलकुमार राजन यांच्या वीस वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याने राजन परिवाराच्या पायाखालची जमीनच सरकली असून त्यांना मोठा धक्का बसला आहे.

मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

एकीकडे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलात्काराची घटना ताजी असतानाचा आता गोव्यामध्येही मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे की काय, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. डिचोली (Bicholim) तालुक्यातील साखळीमधील परिसर या धक्कादायक घटनेने हादरुन गेला आहे. महत्त्वाचं म्हणजे साखळी हा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांचा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात गंभीर घटना घडल्यानं संताप व्यक्त केला जातो आहे. आता पोलिस तपासातून याप्रकरणी काय अधिक उलगडा होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!