मांद्रे मनोरंजन सिटीला आमचा विरोधच !

नियोजित जागेची पाहणी केल्यावर विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केली भूमिका

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : सरकारी जागेत एखादा प्रकल्प आणून तो खाजगीरीत्या लीजवर देणे, या सरकारच्या धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. मांद्रे येथील सरकारी जागेत होवू घातलेल्या मनोरंजन ग्रामला आमचा तीव्र विरोध आहे. हा प्रकल्प जर स्थानिकाना नको असेल तर स्थानिक आमदार आणि सरकार तो का लादतात, असा प्रश्न उपस्थित करून आग्वाद किल्ला आणि मनोरंजन सिटी यालाही आमचा विरोध असल्याचे गोवा फॉरवर्ड नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी मांद्रे जुनासवाडा येथील नियोजित जागेची पाहणी केल्यावर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

आमदार विजय सरदेसाई म्हणाले, गोवा पर्यटन विकास महामंडळाची सध्या लुट चालू आहे. ज्या सरकारच्या जमिनी आहे त्या जमिनी लीजवर देण्याचा सपाटा लावला आहे. करोडो रुपये खर्च करून आग्वाद किल्ल्याचे सुशोभीकरण केले आहे. आता तो किल्ला दृस्ठी या खाजगी संस्थेला लीजवर देत आहेत. शिवाय मांद्रे जुनासवाडा येथील होवू घातलेला मनोरंजन ग्रामची जागा लीजवर देवून खाजगीकरण केले जाणार आहे . या दोन्ही विषयांना आमचा विरोध आहे.

दरम्यान, पर्यटन व्यवसायाला चालना व प्रोत्साहन देण्यासाठी आता निसर्गसंपन्न मांद्रे पंचायत क्षेत्रात जुनासवाडा मांद्रे येथील सरकारी १ लाख ६४ हजार चौरस मीटर जागेपैकी १ लाख पन्नास हजार चौरस जमिनीत एंटरटेनमेंट व्हिलेज मनोरंजन प्रकल्प ३०० कोटी खर्च करून उभारला जाईल. त्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. तीन महिन्याच्या आत महसूल विभागाकडे असलेली जागा पर्यटन खात्यामार्फत नंतर ती गोवा पर्यटन विकास महामंडळ यांच्या ताब्यात दिली जाणार आहे. त्याची पायाभरणी १९ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.

दरम्यान, गोवा फॉरवर्डचे नेते तथा फातोर्डा आमदार विजय सरदेसाई यांनी या जागेची पाहणी केली व स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी मांद्रे गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर, दुर्गादास कामत, स्थानिक नागरिक व टॅक्सी व्यावसायिक उपस्थित होते.

सरकारने सरकारच्या जमिनी पावणीवर काढली आहे. हि जागा अजून गोवा विकास महामंडळाच्या ताब्यात सुद्धा नसताना आखण्याचे गणित आमदार सोपटे मांडत आहेत. वर्षाचा एक इवेन्ट करण्यासाठी पूर्ण जागा खाजगीरीत्या देणे योग्य नाही. गावाचा विरोध असल्याने आमचाही या प्रकल्पाला विरोध असल्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

मोपा विमानतळ परिसरात यापूर्वीच सरकारने इंटरटेटमेंट झोन जाहीर केला आहे तर मग एकाच तालुक्यात दोन झोनची काय गरज, असा सवाल आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!