ब्रेकिंग! कर्फ्यू ७ दिवसांनी वाढवला, तर अत्यावश्यक दुकानांनाही अल्पसा दिलासा

दुकानं आता दुपारी ३ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : कर्फ्यूचा निर्णय रविवारी होईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सर्व शक्यतांना पूर्णविराम लावलाय. अखेर राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये वाढ करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. त्यासोबत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना शिथिलता देत, या दुकानांच्या वेळेत वाढ करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

नेमका काय निर्णय?

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कर्फ्यू वाढवत असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्यातील कर्फ्यू सात दिवसांनी वाढवला असून आता १४ जून पर्यंत राज्यात कर्फ्यू लागू असणार आहे. १४ जून रोजी सकाळी सात पर्यंत कर्फ्यू लागू असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

हेही वाचाः राज्यात 100 टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत संचारबंदी वाढवा

दरम्यान, कर्फ्यू वाढवण्यासोबतच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अत्यावश्यक सेवेतील दुकानांही दिलासा दिलाय. अत्यावश्यक सेवेतील दुकानं उघडी ठेवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. आता सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकानं खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे किराणा मालाची दुकानं आणि अन्य ज्या दुकानांना खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली होती, त्यांना आता आणखी अतिरीक्त दोन तास दुकानं उघडी ठेवता येणार आहेत.

आणखी काय दिलासे?

दरम्यान, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर काही दिलासेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला दिले आहेत. कडधान्यांसोबत घर बांधकाम साहित्य, पावसाळी साहित्य आणि स्टेशनरीची दुकानं ही देखील या वेळेत सुरु राहतील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे काहीसा दिलासा व्यक्त केला जातोय. कोरोना रुग्णवाढ आटोक्यात आलेली असतानाच कोरोनाचं लसीकरण करण्यावर सरकार भर देतंय. दरम्यान, रुग्णवाढ घटली असली तरी सलग तीन दिवस १७ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी काळजी करायला लावणारी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंधात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारीच मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर करत चर्चांना पूर्णविराम लावलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!