‘ओस्सय ओस्सय’ | शिमगोत्सव रद्द होणार?

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे शिमगोत्सव रद्द करण्याचा विधानसभेत प्रस्ताव; सरकारकडून आज निर्णय होणार जाहीर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात कोविडबाधित मिळण्याचं प्रमाण वाढतंय. करोनाची छाया पुन्हा गडद होत असल्यामुळे शिमगोत्सव संकटात सापडलाय. वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिमगोत्सव आयोजित करण्याबाबत सरकार सर्व गोष्टींचा विचार करून शुक्रवारी निर्णय जाहीर करेल, असं पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी सांगितलं.

कोरोना रुग्णांच्या प्रमाणात वाढ

राज्यात गुरुवारी या तीन महिन्यांतील सर्वाधिक १८९ नवे करोनाबाधित मिळालेत. बुधवारी १४०, सोमवारी १३३ बाधित आढळलेत. या आठवड्यात दररोज नवे बाधित मिळण्याचं प्रमाण वाढतंय. राज्यात गुरुवारी ६६ रुग्ण करोनामुक्त झालेत. सध्या १२७८ सक्रिय बाधित आहेत. एका बाधिताचा मृत्यू झाल्याने एकूण करोना मृतांचा आकडा ८२२ झालाय.

शिमगोत्सवावर कोरोनाचं सावट

होळी आणि शिमगा हा गोमंतकीयांचा जिव्हाळ्याचा सण. अनेक वर्षांपासून शासकीय स्तरावर शिमगोत्सव साजरा केला जातोय. गावोगावी विविध कार्यक्रम आयोजित केले जातायत. चित्ररथ मिरवणूक हे शिमगोत्सवाचं खास आकर्षण. पणजीत आझाद मैदानावर गुलालोत्सव आयोजित केला जातो. करोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नुकताच पणजीत कार्निव्हल पार पडला. फेब्रुवारीत बाधितांची संख्या कमी होती. त्यावेळी सरकारने पणजी, म्हापसा आणि फोंडा येथे शिमगोत्सव आयोजित करण्याचं ठरवलेलं. आता करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे शिमगोत्सव साजरा होणं अशक्य वाटतंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!