कॅसिनो, स्पासह अन्य सेवांबाबत आदेश जारी : कर्फ्यू हटवल्यात जमा

पर्यटन व्यवसायाला मिळणार गती; कोविड नियमांचे पालन करून स्पा व मसाज पार्लर सुरू करण्याची मुभा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कृती समितीच्या निर्णयानंतर कॅसिनो, रिव्हर क्रुझ, वॉटर पार्क, मनोरंजन पार्क ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याला सरकारने मान्यता दिली आहे. स्पा व मसाज पार्लर सशर्त अटींवर सुरू करण्याची मुभा आहे. शिक्षण खात्याने विशेष एसओपी जारी केल्यानंतर शाळा सुरू करण्याला हरकत नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. महसूल सचिव संजय कुमार यांनी महामारी कायदा १८९७च्या कलम २ खाली आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ खाली हा आदेश जारी केला आहे. या आदेशात कर्फ्यू वाढवण्यासंदर्भात उल्लेख नसल्यामुळे सरकारने कर्फ्यू हटवल्यातच जमा आहे.

आदेशातील ठळक बाबी

मास्क, थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझरचा वापर करून कॅसिनो ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याला हरकत नाही. कोविडची लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल. करोनाचे दोन्ही डोस घेऊन १५ दिवस पूर्ण झालेले किंवा ७२ तासांपूर्वीचा कोविड निगेटिव्हचा आरटीपीसीआरचा अहवाल आवश्यक आहे.

ऑडिटोरियम/सभागृह ५० टक्केपेक्षा अधिक लोकांना प्रवेश मिळणार नाही.कर्फ्यूचा आदेश सोमवारी सकाळी ७ वाजता संपतो. तो वाढवण्याबाबत या आदेशात कोणताच उल्लेख केलेला नाही.

रिव्हर क्रुज, वॉटर पार्क, मनोरंजन पार्क ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा

चित्रपटगृहांत क्षमतेच्या ५० टक्क्यांहून अधिक लोकांना प्रवेश मिळणार नाही.

आंतरराज्य प्रवासांवर निर्बंध असले तरी करोनाची लक्षणे नसलेल्या आणि दोन्ही दोन्ही डोस घेऊन १५ दिवस पूर्ण झालेल्यांना प्रवेश. वैद्यकीय, आपत्कालीन उपचारासाठी येण्याला मान्यता. त्यासाठी पुरावा असणे आवश्यक.

मालवाहू गाड्यांना दोन चालक आणि एक मदतनीस यांना प्रवेश. (तपासणी केली जाईल.)
७२ तासांपूर्वीचा कोविड निगेटिव्हचा आरटीपीसीआरचा अहवाल असलेल्यांना प्रवेश दिला जाईल.
केरळहून येणाऱ्या प्रवाशांसाठीचे निर्बंध यापूर्वी जारी केले आहेत.

हा व्हिडिओ पहाः Huge Fish Dead | 30 ते 35 फूट लांब व्हेल मासा मृतावस्थेत आढळला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!