गाडेवाल्यांना नव्याने जागा देण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुख्यमंत्र्यांची माहिती; परप्रांतीयांना परस्पर गाडे चालवायला देण्याचे प्रकार बंद होण्याची गरज

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः बांबोळीतील गोवा मेडिकल कॉलेजच्या बाहेर रस्त्यावर असलेले बेकायदेशीर आणि अतिक्रमण केलेली दुकाने गुरुवारी सरकारकडून हटवण्यात आल्यानंतर विविध स्तरातून सरकारवर टीका करण्यात आली.

हेही वाचाः शिवसेनेनं दोन तास रोखला महामार्ग

गाडेवाल्यांना नव्याने जागा देण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी जीएमसीला विश्वासात घेऊन गाडेवाल्यांना नव्याने जागा देण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचं सांगितलंय. तसंच जे मूळ गोमंतकीय फळे विक्रेते आहेत त्यांना नव्यान जागा देणार असून आम्हाला कुणाचाच व्यवसाय बंद करायचा नाही, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणालेत.

हेही वाचाः केपेत ‘पीक विमा सप्ताहा’चा शुभारंभ

परप्रांतीयांना परस्पर गाडे चालवायला देण्याचे प्रकार बंद व्हायला हवेत

जीएमसीच्या बाहेर असलेल्या दुकानांमध्ये बरीच दुकाने ही परप्रांतीयांना चालवायला दिलेली आहेत. त्याचप्रमाणे बरे गाडे आणि दुकानं ही बेकायदा असल्याने प्रशासनाने ती हटवली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तसंच फक्त परप्रांतीयांना परस्पर गाडे चालवायला देण्याचे प्रकार बंद झाले पाहिजेत, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!