नागवे-सत्तरीतील अवैध भंगारअड्ड्यांवर काम ताबडतोब बंद करण्याचे आदेश…

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई : म्हाऊस पंचायत क्षेत्रातील नागवे या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर भंगार अड्ड्याच्या विरोधात पंचायतीने कणखर भूमिका घेतली आहे. या भंगार अड्ड्याबरोबरच इतर बेकायदेशीर व्यवसायिकांना पंचायतीने नोटीस जारी केल्या असून काम ताबडतोब बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत.
हेही वाचाःमुख्यमंत्र्यांचा भाऊ असल्याचा आव आणून क्लबमध्ये घुसण्याचा प्रयत्न…

पथकाने धाड घालून संशयिताला केली अटक

नागवे सत्तरी या ठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या भंगार अड्ड्यावर बांगलादेशी घुसखोर आढळून आले होते. दहशतवादी विरोधी पथकाने सदर ठिकाणी धाड घालून बिलाल अन्वर आखोन याला अटक केली होती. यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. नागवे या ठिकाणी बेकायदेशीर भंगार अड्ड्याच्या विरोधात पंचायतीने धडक कारवाई सुरू केलेली आहे. पंचायतीने या भंगार अड्ड्याला कायदेशीर नोटीस दिली असून सदर अड्डा बंद करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे याच अड्ड्याच्या शेजारी लाकडी वस्तू तयार करण्यात येणारा व्यवसाय व सिमेंटच्या वस्तू तयार करण्यात येणाऱ्या प्रकल्पाविरोधातही पंचायतीने आदेश जारी केलेला आहे.
हेही वाचाःInd vs Aus 3rd T20 : भारताचा मालिका विजय, सूर्यकुमार-विराटची शानदार खेळी…

घुसखोरांना अटक केल्यामुळे पंचायतींची बदनामी

संपूर्ण बेकायदेशीर अड्डे व उभारण्यात आलेल्या शेडस हटविण्यात येण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. अन्यथा सर्व शेड ज​मिनदोस्त करण्याचा इशारा पंचायतीने दिलेला आहे. दरम्यान, पंचायतीने जारी केलेल्या नोटिसांची दखल घेऊन या भागातील बेकायदेशीर भंगार अड्डा व इतर व्यवसाय बंद करण्यात आलेले आहेत. याचे स्थानिकांनी स्वागत केले आहे. अशा बेकायदेशीर भंगार अड्डे व इतर स्वरूपाच्या व्यवहारामुळे बांगलादेशी या भागांमध्ये स्थायिक झालेले आहेत. या भागातून आतापर्यंत चार बांगलादेशी घुसखोरांना दहशतवादी विरोधी पथकाने अटक केल्यामुळे नागवे व म्हाऊस पंचायतींची बदनामी झालेली आहे. यामुळे अशा प्रकाराविरोधात पंचायतीने धडक कारवाई करावी व भविष्यात अशा व्यावसायिकांना परवाने देऊ नयेत, अशी मागणी म्हाऊस पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे.
हेही वाचाःगोवन वार्ता लाईव्ह वेबसाईटच्या द्वितीय वर्ष पूर्तीनिमित्त…

बैठकीमध्ये बेकायदेशीर व्यवसायांविरोधात तीव्र नाराजी

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नागवे येथील स्थानिकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये बेकायदेशीर व्यवसायांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या व्यवसायामुळे या भागांमध्ये परप्रांतीयांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे स्थानिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली असून येणाऱ्या काळात या भागातील महिला भगिनी यांच्यासमोर भीती निर्माण झालेली आहे. पंचायतीने घेतलेली कडक भूमिका याचे नागरिकांनी स्वागत केले असून पुन्हा असे बेकायदेशीर व्यवहार या भागांमध्ये सुरू होणार नाहीत याची विशेष काळजी घेण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केलेली आहे. पंचायत क्षेत्रामध्ये राहणाऱ्या भाडोत्री नागरिकांसंदर्भातील माहिती पंचायतीला पंधरा दिवसांच्या आत सादर करणे गरजेचे आहे. अन्यथा पंधरा दिवसानंतर या संदर्भात सर्वेक्षण करून भाडेकरूंना ठेवणाऱ्या घरमालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पंचायतीने दिलेला आहे. 
हेही वाचाःInterview | भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारा डेव्हलपमेंट फॉर्म्यूला…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!