सोनू यादव मृत्यूप्रकरणी 5 जणांवर आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी

1 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी:  सांताक्रुझ येथील इम्रान बेपारी याच्या घरावर हल्ला करण्याऱ्या टोळीतील सोनू यादव याचा गोळी लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने  संशयित मार्सेलिन डायस याच्यासह ५ जणावर आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ ऑगस्ट रोजी होणार आहे.

हेही वाचाः किर्लोस्कर बंधूतही भाऊबंदकीचा वाद

5 जणांवर 300 पानी आरोपपत्र दाखल

या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात मुख्य संशयित मार्सेलिन डायस याच्यासह ५ जणांवर सुमारे ३०० पानी आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यात पोलिसांनी सुमारे ४० हून अधिक साक्षीदारांची जबानी नोंद केली होती.

हेही वाचाः ऐकावं ते नवलंच! बदली रद्द करण्यासाठी दिलं ‘हे’ कारण

काय आहे प्रकरण?

न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, सांताक्रुझ येथील इम्रान बेपारी याच्या घरावर २० जून २०२० रोजी पहाटे ३ ते ३.३० दरम्यान पूर्ववैमनस्यातून २० ते २५ बुरखाधारी युवकाने हल्ला केला होता. या वेळी हल्ला करण्याऱ्या टोळीतील सोनू यादव याचा गोळी लागून मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं. या खून प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी मुख्य संशयित मार्सेलिन डायस याच्यासह रॉनी डिसोझा, फ्रान्सिस नाडार, समर्थ शिरोडकर आणि मयुर आर्लेकर या पाच जणांना अटक केली. या खून प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, १२०बी व इतर कलमाखाली, तसंच शस्त्र कायद्याचे कलम ३ व ५ व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या घटनेत वापरण्यात आलेले एक पिस्तूल, दोन रिवॉल्वर, चार तलवारी आणि दोन चॉपर अशी शस्त्रे जप्त केली आहेत.

हेही वाचाः गोव्यातील पोलीस आणि अधिकारी मॅनेज होऊ शकतील

पुढील सुनावणी ९ ऑगस्ट रोजी

या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यानतंर हे प्रकरण उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणी सुनावणी घेऊन न्यायालयाने मुख्य मार्सेलिन डायस याच्यासह ५ जणांवर आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ ऑगस्ट रोजी होणार आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | PARATEACHER`S | पॅरा टीचर्सची सतावणुक बंद करा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!