पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट!

राज्यात आतापर्यंत ६३ इंचांपेक्षा अधिक पाऊस

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी रात्रीपर्यंत राज्यभर अविरत कोसळलेल्या पावसाने शनिवारी विसावा घेतला. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत होण्यास मदत झाली. परंतु, राज्य हवामान विभागाने १४ जुलैपर्यंत राज्यातील ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस कधीही होऊ शकतो.     
हेही वाचा:दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याच्या कामात व्यस्त राहू नका…

दोन्ही दिवशी पावसाची राज्यभर हजेरी

राज्यात दाखल झाल्यापासून सातत्याने कोसळत असलेल्या मान्सूनने गेल्या सोमवारपासून उग्र रुप धारण केले. सोमवार आणि मंगळवारी सलग दोन्ही दिवशी पावसाने संपूर्ण राज्यभर हजेरी लावली. त्यानंतर बुधवारी काही प्रमाणात विसावा घेतला. त्यानंतर मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने पुन्हा पाऊस उग्र रुप धारण करण्याची शक्यता वर्तवत हवामान विभागाने शुक्रवारी रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार गुरुवारी रात्रभर मुसळधार पावसाने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला. गुरुवार आणि शुक्रवारच्या चोवीस तासांत राज्यात तब्बल ६.६४ इंच पावसाची नोंद झाली. त्यानंतरही बऱ्याच भागांत संततधार कायम राहिली.     
हेही वाचा:GOA | ‘हे’ काँग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार ?

यंदाचा पाऊस १४ इंचांनी अधिक

दरम्यान, यंदाच्या मान्सून हंगामात १ जून ते ९ जुलै या कालावधीत राज्यात ६३ इंचांपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. गत हंगामात या कालावधीत सरासरी ४९ इंच पावसाची नोंद झाली होती. यावरून यंदाचा पाऊस १४ इंचांनी अधिक असल्याचे दिसून येते.     
हेही वाचा:RAPE | सख्या भावानेच केला बहिणीवर बलात्कार…  

पुराचा धोका टळला     

गुरुवार आणि शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतांशी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. पाऊस कायम राहिल्यास नद्यांना पूर येण्याची शक्यता होती​. त्यामुळे नद्यांच्या परिसरातील जनतेत भीतीचे वातावरण पसरले होते. पण, शनिवारी पावसाने विसावा घेतल्याने नद्यांच्या पाणी पातळीत घट झाल्याने पुराचा धोका टळला. दुसरीकडे रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा निचरा होऊन रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले.         
हेही वाचा:गोवा : तरुणाच्या हुशारीमुळे दोन सरकारी कर्मचारी तुरुंगात…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!