संयुक्त बैठकीनंतर विरोधकांचा घणाघात, स्थिती सुधारण्यासाठी सरकारला काय प्रेमाचा सल्ला? वाचा सविस्तर

बैठकीला काँग्रेस, मगोप, गोवा फॉरवर्ड आणि दोन अपक्ष आमदारांनी उपस्थिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात होणारा कोरोनाचा फैलाव रोखण्यात सरकार अपयशी ठरलंय, अशी चौफेर टीका विरोधी पक्षांकडून केली जातेय. सरकार विरोधी पक्षांच्या सूचना विचारात घेत नसल्याने तसंच लॉकडाऊन हा अंतिम पर्याय यावर ठाम असल्याने विरोधी पक्ष चांगलेच खवळलेत. त्याच कोरोनाचं दिवसेंदिवस वाढत जाणारं प्रस्थ, आणि यामुळे वाढणारी मृतांची संख्या, एकंदरीतच कोरोना प्रकरण समस्त गोंयकारांसाठी भीतीचा विषय ठरलाय. कोरोना विरुद्ध सरकार राबवत असलेल्या उपाय-योजनांना यश मिळत नसल्यानं यावर एखादी रणनीती ठरवण्यासाठी मंगळवारी विरोधी पक्षांची बैठक झाली. विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस, मगोप, गोवा फॉरवर्ड आणि दोन अपक्ष आमदारांनी उपस्थिती लावली. यावेळी विरोधी पक्षांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.

हेही वाचाः गोव्यात 10 ते 15 दिवस कडक लॉकडाऊन कराच

टास्क फोर्सच स्थापना करावी

बैठकीला सुरुवात करताना विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. सरकारने गरीबांचा विचार करावा. तसंच गरीबांचा लस कशी देणार, हे सरकारने सांगावं, याचा आग्रह कामतांनी धरला. त्याच प्रमाणे खासगी रुग्णालयांना लस मिळू शकते तर सरकारला का मिळत नाही, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी सरकारने टास्क फोर्सच स्थापना करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

या बैठकीला गोवा फॉर्वर्डचे नेते विजय सरदेसाई उपस्थित होते. यावेळी बोलताना सरदेसाईंनी सरकारला धारेवर धरलं. गोव्यात सरकारच नाही असं दिसतंय. सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे, असं म्हणत सरदेसाई सरकारवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्र्यांना कोणतंही व्हिजन नाही, त्यांनी राजीनामा द्यावा. तसंच जबाबदारी घेऊन सावंतांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सरदेसाईंनी यावेळी केली.

महामारी गोंयकारांना संपवतेय

बैठकीत उपस्थित असलेले विरोधकांनीही यावेळी आम्ही हेल्पलेस झालो आहोत असं म्हणत आपली बाजू स्पष्ट केली. तसंच एका वर्षांनंतरही चाचण्यांचा सोय पुरेशी नाही यावर दुःख व्यक्त केलं. लसी परदेशांना दिल्या, तर देशांचं काय होणार म्हणत विरोधकांनी चिंता व्यक्त केली. ही महामारी गोंयकारांना संपवतेय. तेव्हा तात्काळ टास्क फोर्सच स्थापना करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली.

हेही वाचाः ‘लॉकडाऊन न्हू’ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही गावं का निर्णय घेत आहेत?

सरकारच्या अपयशामुळे सामान्य गोंयकार मरतोय

सरकारच्या अपयशामुळे आज सामान्य गोंयकार मरतोय, अशी तिखट टीका गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप सिंह राणेंनी केली. सर्वाधिक पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या गोव्यात कोण पर्यटक येणार? असा टोलाही त्यांनी सरकारवर हाणला. त्याचप्रमाणे लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक करण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

लोकं रस्त्यावर येण्याआधी सरकारनं पावलं उचलावीत

मगोप नेते सुदिन ढवळीकरांनी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तरच या कोरोनावर आपण मात करू शकतो, असं म्हटलं. तसंच विरोधकांना सरकार डावलत आलंय. या महामारीतही सरकारला सत्ता प्यारी आहे. विरोधकांनी दिलेल्या सूचनांवर त्यांना विचार करायचा नाही, असं म्हणत वाढत्या कोरोनाला सरकारच जबाबदार असल्याचं त्यांनी यावेळी मत मांडलं. त्याचप्रमाणे लोकं रस्त्यावर येण्याआधी सरकारनं पावलं उचलावीत, असं म्हणत ढवळीकरांनी सरकारला सावध केलं.

800x450 sudin dhavlikar

केंद्रानं लॉकडाऊन करण्याची मुख्यमंत्री वाट पाहतायत का?

प्रशासन हतबल आहे, यंत्रणा कोलमडू लागली आहे. सन्मवयासाठी तयार केलेला व्हॉट्सअप ग्रुपही सरकारने बंद केला. सरकारमधील अंतर्गत वाद गोंयकारांना जीव घेतोय, असं म्हणत पर्वरीचे आमदार रोहन खंवटेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. तसंच केंद्रानं लॉकडाऊन करण्याची मुख्यमंत्री वाट पाहतायत का? असा सवाल खंवटेंनी या बैठकीत उपस्थित केला. त्याच प्रमाणे खासगी रुग्णालयात ‘डीडीएसएसव्हाय’ योजना अजून सुरू झालेली नाही, म्हणत खंवटेंनी सरकारवर हल्लाबोल केला.

rohan k 800X450
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!