आयआयटीला स्वकियांकडूनच विरोध : फळदेसाई

९० टक्के स्थानिकांचा पाठिंबा असल्याचाही दावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : स्वत:ला भाजप नेते म्हणवून घेणाऱ्यांकडूनच सांगेतील आयआयटी प्रकल्पाला विरोध होत आहे. परंतु, सांगेतील ९० टक्के नागरिकांना हा प्रकल्प हवा आहे. त्यामुळे कोणाच्याही ​विरोधाला मी घाबरत नाही. काहीही झाले तरी आयआयटी सांगेतच उभी राहील, असा निर्धार मंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी प्रुडंट वृत्तवाहिनीवरील ‘हेडऑन’ कार्यक्रमात व्यक्त केला.
हेही वाचाःTarun Tejpal case : सुनावणी इन कॅमेरा घेण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली…

मतदारसंघातील ९० टक्के जनतेने प्रकल्पाला पाठिंबा

सांगे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीच आपण आयआयटीसारखा राष्ट्रीय प्रकल्प सांगेत आणण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मतदारसंघातील ९० टक्के जनतेने प्रकल्पाला पाठिंबा दिलेला आहे. हा प्रकल्प ज्या उगे पंचायतीत येतो, त्या पंचायतीनेही ग्रामसभेत प्रकल्पाला मान्यता देण्याचा ठराव मंजूर केलेला आहे. सोबतच इतर सहा पंचायतींनीही पाठिंबा जाहीर केलेला आहे. पण, सध्या जो विरोध सुरू आहे तो राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे फळदेसाई म्हणाले.
हेही वाचाःजणू लाईफ लाईन परतली…

ती जागा सरकारच्या मालकीची

आयआयटीसाठी कोठार्ली येथील जी जागा निवडण्यात आली होती, ती जागा सरकारच्या मालकीची आहे. त्या भागात खासगी जमिनी असत्या, तर त्यांच्या मालकांनी आतापर्यंत जमिनींची कागदपत्रे सादर करून विरोध दर्शवला असता, असे त्यांनी सांगितल्या. भाजपमध्ये राहून प्रकल्पांना विरोध करणारे नेते आयआयटी प्रकल्प विरोधकांच्या आंदोलनाला फूस लावत आहेत. आयआयटी सांगेत आल्यास आपले राजकीय स्थान आणखी बळकट होईल याची त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळेच ते या प्रकल्पाला विरोध करीत आहेत, असा दावाही फळदेसाई यांनी केला.
हेही वाचाःएफटीआयआयच्यावतीने इफ्फीदरम्यान दिव्यांगांसाठी आयोजित कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद…

आणखी दोन-तीन ठिकाणी जागा

कोठार्ली येथील जमीन अपुरी पडत असल्याने ती नाकारण्यात आली असली​, तरीही प्रकल्पाला पुरेल इतकी सरकारी जमीन सांगेत आणखी दोन ते तीन ठिकाणी आहे. आयआयटी प्रशासनाला आपण त्याही जागा दाखवू आणि आयआयटी सांगेतच आणू, असेही मंत्री सुभाष फळदेसाई यांनी नमूद केले.
हेही वाचाःआयुष हॉस्पिटलचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ११ रोजी उद्घाटन…


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!