VIDEO | कामकाज तहकूब झाल्यानंतर विरोधकांची सरकारवर टीका

समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं विरोधकांचा संताप

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः 3 दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात विरोधकांनी सरकारला विविध विषयांवरून घेरायला सुरुवात केलीये. विरोधकांच्या प्रश्नांनी सरकारची बोलती बंद झालीये. विरोधकांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्यांचा संताप झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठलेली पाहायला मिळालीये. त्यातच नाटक या शब्दावरून विधानसभेत ड्रामा झाल्यानं विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विधानसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा सरकारवर टीकांचा मारा करण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!